'नवीन सरकार लवकर येणं आवश्यक कारण....' शरद पवारांनी व्यक्त केली खरी काळजी

'नवीन सरकार लवकर येणं आवश्यक कारण....' शरद पवारांनी व्यक्त केली खरी काळजी

'शिवसेना आणि भाजपने हा पोरखेळ लवकरात लवकर थांबवावा असं मला वाटतं. 9 तारखेपूर्वी नवं सरकार स्थिर असणं आवश्यक आहे, कारण....' News18 Lokmat ला दिलेल्या EXCLUSIVE मुलाखतीत शरद पवार यांनी व्यक्त केली वेगळीच काळजी.

  • Share this:

विनया देशपांडे मुंबई, 1 नोव्हेंबर : सरकार बनवायचं असेल तर भाजपला आज ना उद्या नमतं घ्यावंच लागेल. कारण सरकार बनवण्यासाठी आवश्यक बहुमत त्यांच्याकडे नाही, असं स्पष्ट करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आम्ही विरोधातच बसणार यावरही शिक्कामोर्तब केलं. पण  शिवसेना आणि भाजपने हा पोरखेळ लवकरात लवकर थांबवावा असं मला वाटतं. 9 तारखेपूर्वी नवं सरकार स्थिर असणं आवश्यक आहे, असंही पवार म्हणाले. News18 च्या विनया देशपांडे यांच्याशी बोलताना शरद पवार यांनी एक महत्त्वाची काळजीही व्यक्त केली.

आपली खरी काळजी कोणती हे सांगताना ते म्हणाले, "सरकार लवकर येणं आवश्यक आहे. कारण 9 तारखेला अयोध्येचा निकाल आहे.  समाजातल्या सगळ्या घटकांमध्ये शांतता राहील याची काळजी घेणं, आवश्यक आहे."

वाचा - शिवसेना खासदाराला घेरण्यासाठी शिवसैनिकच एकवटले, अडचणी वाढणार?

"अयोध्या प्रकरणात यापूर्वी मुंबईत आणि महाराष्ट्रात काय झालंय आपण पाहिलं आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत सरकार तिथे असणं, त्यांनी विश्वास देण्याची जबाबदारी घेणं गरजेचं आहे."

सत्तेसाठी सध्या दोन्ही पक्ष वाद घालत असेल तरी जो पक्ष दमेल त्याला नमतं घ्यावं लागेल. सत्तास्थापनेसाठी भाजपकडे पर्याय नाही. भाजपने कितीही अपक्ष उमेदवारांना हाताशी धरलं तरी ते बहुमताचा आकडा पार करू शकणार नाहीत. त्यामुळे त्यांना शिवसेनेचे मुद्दे मान्य करावे लागतील असंही शरद पवारांनी सांगितलं आहे.

वाचा - नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर शरद पवार, पिकांची केली पाहणी

'पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत गेल्या अनेक दिवसांपासून माझं बोलणं झालेलं नाही.

फक्त आम्ही 3 महिन्यांपूर्वी संसदेत बोललो होतो. काँग्रेसने यापूर्वीच स्पष्ट भूमिका घेतली आहे की आम्ही भाजप आणि शिवसेनेसोबत जाणार नाही. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी दुसऱ्या कोणाशी हातमिळवणी करण्याची शक्यता नाही,' असं CNN News18 सोबत बोलताना शरद पवार यांनी म्हटलं आहे.

आमच्याकडे प्रस्ताव नाही

सत्ता स्थापनेविषयी आमच्यासमोर कुठलाही प्रस्ताव नाही.

वाचा - भाजप नेत्याचं वादग्रस्त कार्टुन, शिवसेनाचा वाघ बिथरणार!

कोणीही आमच्याशी बोलले नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. तर आम्ही विरोधी पक्षातच असणार आहोत या भूमिकेवर पवारांनी पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केला आहे.

काँग्रेस सेनेबरोबर जाणार नाही

दरम्यान, काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याच्या राजकीय चर्चा सुरू आहेत. याविषयी बोलतना पवार म्हणाले, "माझा काँग्रेसवर विश्वास आहे. ते शिवसेनेला कधीही पाठिंबा देणार नाहीत. त्यांच्या हायकमांडची भूमिका मला माहिती आहे. अजूनपर्यंत तरी ते शिवसेनेसारख्या पक्षाला मदत करतील असं मला वाटत नाही," असं ते म्हणाले.

VIDEO: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी मुलाखत, काय म्हणाले शरद पवार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2019 03:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading