शिवसेनेला धक्का; युतीबद्दल शरद पवारांचं मोठं विधान

शिवसेनेला धक्का; युतीबद्दल शरद पवारांचं मोठं विधान

आमच्याकडे दुसरे पर्याय खुले आहेत, असं शिवसेना नेते म्हणत असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना अद्याप कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचं दिसत आहे. शरद पवार यांनी आज याच भूमिकेचा पुनरुच्चार केला. काय म्हणाले शरद पवार?

  • Share this:

मुंबई, 9 नोव्हेंबर : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर केलेलं भाष्य आणि त्यावर उद्धव ठाकरेंनी दिलेलं उत्तर यामुळे युतीचे संबंध आणखी ताणले गेले. आमच्याकडे दुसरे पर्याय खुले आहेत, असं शिवसेना नेते म्हणत असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना अद्याप कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचं दिसत आहे. शरद पवार यांनी प्रभावी विरोधी पक्ष हीच आमची जबाबदारी असल्याचा आज पुनरुच्चार केला. शिवसेनेबरोबर जाण्याचा कुठलाही विचार अजून झालेला नाही, असंही पवार यांनी स्पष्ट केलं.

अयोध्या प्रकरणाच्या निकालासंबंधात बोलताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या निकालाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काहीही परिणाम होणार नाही, असं सांगितलं. "अयोध्येच्या निकालावरून महाराष्ट्रातलं राजकारण बदलणार नाही. लोक दोन-तीन दिवसात लोक विसरून जातील," असं पवार म्हणाले.

वाचा - अयोध्याच्या ऐतिहासिक निकालावर संभाजी भिडे यांची धक्कादायक प्रतिक्रिया

राज्यातल्या परिस्थितीबद्दल विचारलं असता शरद पवार म्हणाले, "पुन्हा एकदा सांगतो... बहुमत आहे त्यांनी सरकार बनवावं. युतीला जनतेनं कौल दिला आहे. प्रभावी विरोधी पक्ष ही आमची जबाबदारी आहे."

वाचा - अयोध्येतील मंदिर-मशिदीच्या ऐतिहासिक निकालावर संजय राऊतांनी केले 'हे' tweet

युतीचं भविष्य काय असेल असं विचाल्यावर युतीच्या नेत्यांना वडिलकीच्या नात्याने सल्लाही त्यांनी दिला. "एक वडील म्हणून माझा सल्ला आहे. कुणी कुणाला खोटं ठरवू नये. 30 वर्षं ते एकमेकांबरोबर आहेत."

दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पहिले मंदिर फिर सरकार असं ट्वीट करत अयोध्या निकालाचं स्वागत केलं आहे.

शिवसेनेबरोबर जाण्यासंबंधी चर्चा सुरू आहे का, यावर पवार म्हणाले, "सेनेबरोबर जाण्याचा कुठलाही विचार आम्ही अद्याप केलेला नाही. आम्ही अजून याची चर्चाही केलेली नाही. राज्यपाल काय करतात ते आम्ही बघतो. लवकरात लवकर स्थिर सरकार राज्यात येणं आवश्यक आहे."

अयोध्येच्या निकालाबद्दल बोलताना पवार म्हणाले, "हा ऐतिहासिक निकाल आहे. याचं स्वागत केलं पाहिजे." देवेंद्र फडणवीस किंवा इतर भाजप नेते राम मंदिरात जाऊन पूजेत सहभागी होणार आहेत, याविषयी विचारलं असता पवार म्हणाले, हा त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे. यात राजकारण नाही.

---------------------------------------------

VIDEO : निकालानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 9, 2019 02:06 PM IST

ताज्या बातम्या