शेतकरी युद्धात जिंकला पण तहात हरला- शरद पवार

शेतकरी युद्धात जिंकला पण तहात हरला- शरद पवार

शरद पवार म्हणाले, 'महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानी शेतकऱ्यांना गंडवलं.कर्जमाफी फक्त अल्पभूधारक शेतकऱ्यांचीच का? महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यायला हवी होती.'

  • Share this:

03 जून : शेतकरी युद्धात जिंकला पण तहात हरला अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी IBNलोकमतशी बोलताना सांगितलं. IBNलोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत पवारींनी मुख्यमंत्र्यांवर थेट आरोप केलाय. ते म्हणाले, 'महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानी शेतकऱ्यांना गंडवलं.कर्जमाफी फक्त अल्पभूधारक शेतकऱ्यांचीच का? - महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यायला हवी होती. शेतमाल खरेदी करताना हमीभाव न देणाऱ्यावर फौजदारी करण्याचा सरकार कायदा करतंय.पण अशा वेळी सरकारने शेतमालाची स्वतः खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा असतो.'

ते पुढे म्हणाले, 'स्वामिनाथन समिती मीच नेमली होती, त्यांच्या काही शिफारसी आम्ही स्वीकारल्या. पण आजच्या सत्ताधारींनी 2014 च्या निवडणुकीत स्वामिनाथन लागू करू असं आश्वासन दिलं होतं. आता त्यांची जबाबदारी आहे.'

शेतकरी संपामागे काँग्रेस - राष्ट्रवादीचा हात आहे असा आरोप करणं हे पोरकटपणा असल्याचं लक्षण आहे, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर थेट हल्ला चढवला. आम्ही जाणीवपूर्वक या संपापासून अलिप्त राहिलो आहोत, असंही त्यांनी स्पष्ट सांगितलं.

अन्नधान्य गरज पडल्यास आयात करू या माधव भंडारी यांच्या वक्तव्यावर ते म्हणाले, 'ही महान आणि विद्वान मंडळी आहेत. मी त्यांच्यावर काय बोलणार , मी साधा शेतकरी कार्यकर्ता आहे.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 3, 2017 12:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading