मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पवार-राणे भेट, कोकणात नव्या राजकारणाची नांदी!

पवार-राणे भेट, कोकणात नव्या राजकारणाची नांदी!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: महाराष्ट्र स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष नारायण राणे यांची कणकवलीत घरी जाऊन भेट घेतल्यामुळे सर्वांच्या उभव्या उंचावल्यात.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: महाराष्ट्र स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष नारायण राणे यांची कणकवलीत घरी जाऊन भेट घेतल्यामुळे सर्वांच्या उभव्या उंचावल्यात.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: महाराष्ट्र स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष नारायण राणे यांची कणकवलीत घरी जाऊन भेट घेतल्यामुळे सर्वांच्या उभव्या उंचावल्यात.

दिनेश केळुसकर, प्रतिनिधी

सिंधुदुर्ग, 03 डिसेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: महाराष्ट्र स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष नारायण राणे यांची कणकवलीत घरी जाऊन भेट घेतल्यामुळे सर्वांच्या उभव्या उंचावल्यात. शरद पवार आणि राणे यांच्या या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं मागील महिन्यापासून तयारीला लागली आहे. काँग्रेससोबत जागेची वाटाघाटी सुरू आहे. कोकणात एक मोठा नेता आमच्यासोबत आहे असं राष्ट्रवादीने जाहीर करत कोकणाची जागा सोडण्याचं आवाहन काँग्रेसला केलं होतं.

या चर्चेनंतर आज शरद पवार थेट नारायण राणे यांची भेट घेण्यासाठी घरी पोहोचल्यामुळे राष्ट्रवादीकडून तो मोठा उमेदवार नारायण राणे आहेत की काय अशी चर्चा आता रंगली आहे.

परंतु, कालपासून शरद पवार सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. ते तारकर्लीला मुक्कामासाठी होते. तेव्हा नारायण राणेंनी निमंत्रण यांनी फोनवरुन निमंत्रण दिले असेल म्हणून ते घरी भेटायला गेले असतील त्या भेटीला राजकीयदृष्टया बघणे योग्य नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

तर खुद्द नारायण राणे यांनी ही कोणतीही राजकीय भेट नव्हती, पवार सिंधुदुर्गात आले होते त्यामुळे त्यांची ही सदिच्छा भेट होती. तुम्हाला काय चर्चा करायची ती करा असं राणेंनी पवारांच्या भेटीनंतर स्पष्ट केलं.

शरद पवार जेव्हा राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी पोहोचले होते. तेव्हा नितेश राणेही पवारांच्या स्वागतासाठी हजर होते. कोकणात कोणताही मोठा नेता आला तर नारायण राणे यांना न भेटता कधी जात नाही. मग ते मुख्यमंत्री असले तरी भेटून जातात असं नितेश राणेंनी सांगितलं.

काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी मराठा आरक्षणासाठी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी राणे म्हणाले होते की, "जर राष्ट्रवादी सिंधुदुर्गात उमेदवार उभा करत नसेल तर हा त्यांचा मोठेपणा आहे. आणि जर ते उभा करत नसतील तर ते आमच्याच फायद्याचे आहे."

नारायण राणे यांच्या या वक्तव्यामुळे त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष हा लोकसभा निवडणूक लढवणार हे स्पष्ट झालं. त्यानंतर जे राजकीय समिकरण निर्माण होईल त्यात राणे आपली स्वातंत्र्य जागा निर्माण करू पाहत आहे. आघाडीचे नेतेही असाचा अंदाज बांधून आहे.

विशेष म्हणजे, काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर नारायण राणे यांनी भाजपात प्रवेश करणार होते. मात्र, राणेंचा प्रवेश होऊ शकला नाही. भाजपकडून नारायण राणे राज्यसभेत खासदार म्हणून गेले. सध्या नारायण राणे हे कोकणात विश्वास सभा घेत आहे. या सभेतून ते नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका करत आहे. त्यामुळे राणे हे आपली स्वतंत्र्य प्रतिमा निर्माण करत आहे. कोकणात भाजपची परिस्थिती खराब आहे. त्यामुळे भाजपने राणे यांना जवळ केलं. परंतु, राणे यांनी शिवसेनेसोबत जर भाजपने युती केली तर आपण सोबत नसणार आहे हे आधीच जाहीर केलं होतं.

शिवसेना जरी स्वबळाचा नारा देत आहे तरी भाजपला युतीची अपेक्षा कायम आहे. त्यामुळे नारायण राणेंही आपली रणनिती आखत आहे.

राष्ट्रवादीची आधीपासून तयारी

21 नोव्हेंबरला काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बैठक पार पडली होती. यात राष्ट्रवादीने सिंधुदुर्गची जागा सोडण्याची मागणी केली होती. सिंधुदुर्गमध्ये आमच्याकडे मोठा उमेदवार आहे असं राष्ट्रवादीने जाहीर केलं होतं. सिंधुदुर्गात मोठा उमेदवार कोण तर नारायण राणे यांचं नाव समोर आलं. सिंधुदुर्गात एक जागा आणि लोकसभा निवडणुकीसाठी रायगडची एक जागा सुनील तटकरेंसाठी सोडली आहे.

नारायण राणे आणि सुनील तटकरे या दोघांना एकमेकांची मदत लागणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षासोबत युती करू शकते. मात्र, काँग्रेसने याबद्दल अजून होकार कळवला नाही.

आता नारायण राणे यांनी जरी ही राजकीय भेट नसल्याचं म्हटलं असलं तरी आगामी काळात या भेटीतून काय समिकरण तयार होतं हे पाहण्याचं ठरणार आहे.

======================================

First published:

Tags: Kankavali, Naryan rane, Sharad pawar, नारायण राणे, शरद पवार