Home /News /maharashtra /

शरद पवार नाराज होऊ शकता, रामदास आठवलेंची उद्धव ठाकरेंना विनंती, म्हणाले...

शरद पवार नाराज होऊ शकता, रामदास आठवलेंची उद्धव ठाकरेंना विनंती, म्हणाले...

 'महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी ठाकरे यांनी भाजपसोबत आले पाहिजे, असे झाल्यास केंद्रातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होऊ शकतो'

'महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी ठाकरे यांनी भाजपसोबत आले पाहिजे, असे झाल्यास केंद्रातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होऊ शकतो'

'महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी ठाकरे यांनी भाजपसोबत आले पाहिजे, असे झाल्यास केंद्रातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होऊ शकतो'

  यवतमाळ, 18 सप्टेंबर :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांच्या विधानामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. ' उद्धव ठाकरे जे बोलले, त्यामुळे कोण कुणासोबत जाईल हे सांगता येत नाही. शरद पवार (sharad pawar) नाराजही होऊ शकता, त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सेनेनं (shivsena) दसरा मेळाव्यापूर्वी भाजप (bjp) सोबत यावं' असं आवाहनच रिपाईचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (ramdas athawale) यांनी केलं आहे. रामदास आठवले हे यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. यावेळी पत्रकार परिषदेत बोलत असताना पुन्हा एकदा त्यांनी शिवसेनेला विनंती केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडली पाहिजे अन्यथा शिवसैनिक सेनेपासून दूर जाईल. अडीच वर्ष सेना आणि अडीच वर्ष भाजप असा मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरू शकतो. भाजपही सकारात्मक विचार नक्की करेल, उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडावे, अशी विनंतीच रामदास आठवले यांनी केली. 'पुन्हा चित्रपटांत कमबॅक कर' करिश्मा कपूरचं सौंदर्य पाहून चाहते पडले प्रेमात! 'उद्धव ठाकरे जे बोलले, त्यामुळे शरद पवार नाराज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुख्यमंत्री ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडले पाहिजे. भारतीय जनता पक्षाने चर्चा करावी' असंही आठवले म्हणाले. सिद्धूंनी केला कॅप्टनचा पत्ता कट; अमरिंदर सिंह यांनी दिला CM पदाचा राजीनामा तसंच, 'महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी ठाकरे यांनी भाजपसोबत आले पाहिजे, असे झाल्यास केंद्रातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होऊ शकतो. उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यापूर्वी निर्णय घ्यावा, दसरा मेळाव्यात आपल्याला व देवेंद्र फडणवीस यांनाही निमंत्रित करून सीमोल्लंघन करण्याचे आवाहन रामदास आठवले यांनी केले. दरम्यान, शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन नवीन खुलासा केला. 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यात जे वक्तव्य केलं ते ठाकरे स्टाईल भाषण होते. उद्धव ठाकरेंनी कुठेही म्हटलं नाहीये की, नवीन गठबंधन होईल, सरकार पडेल किंवा आम्ही या सरकारमधून बाहेर पडू. उद्धवजींचे स्पष्ट संकेत आहेत की ज्यांना भावी सहकारी व्हायचं आहे ते आमच्याकडे येऊ इच्छित आहेत. त्यांनी बोट दाखवून, नाव घेऊन सांगितलं आहे आणि ज्या हालचाली राजकारणात दिसत आहेत. विशेषत: चंद्रकांत पाटील यांनी केलेलं वक्तव्य की माजी मंत्री म्हणू नका. याचाच अर्थ असा की, कुणीतरी तिकडे आहे ज्यांना इथे यायचं आहे आणि उद्धवजींनी संकेत दिले आहेत की तुम्ही या. बरेच लोक येऊ इच्छितात' असं म्हणत संजय राऊत यांनी गौप्यस्फोट केला आहे.

  तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

  Published by:sachin Salve
  First published:

  Tags: Ramdas athawale

  पुढील बातम्या