सोनिया -पवार भेटीनंतर संभ्रम वाढला; शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतले 10 मोठे मुद्दे

सोनिया -पवार भेटीनंतर संभ्रम वाढला; शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतले 10 मोठे मुद्दे

शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर महाराष्ट्रातल्या सत्तास्थापनेचा पेच आणि संभ्रम आणखी वाढला आहे. पवार यांनी पत्रकार परिषदेत नेमकं काय सांगितलं.. महत्त्वाचे 10 मुद्दे

  • Share this:

नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या दिल्लीतल्या भेटीकडे आज महाराष्ट्राची नजर होती. राज्यात सरकार स्थापन होणार का, कधी होणार, कुणाचं होणार, शिवसेनेला साथ द्यायला काँग्रेस - राष्ट्रवादी तयार आहेत का,  या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या भेटीनंतर मिळतील अशी अपेक्षा होती. पण सत्तास्थापनेचा पेच सुटण्यापेक्षा अधिकच वाढला आहे. सोनिया गांधींच्या भेटीनंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी आमची फक्त राजकीय परिस्थितीविषयी आपसांत चर्चा झाली असल्याची माहिती पवारांनी दिली. शिवसेनेविषयी आमच्यात काहीच चर्चा झाली नाही, असं शरद पवार म्हणाले.

शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतले 10 मोठे मुद्दे

1. सोनिया गांधी यांच्याबरोबरची चर्चा फक्त राजकीय परिस्थितीबद्दल, शिवसेनेबरोबर जाण्यासंबंधी चर्चा नाही.

2. राज्यातल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांमध्ये किमान समान कार्यक्रमाची चर्चा नाही.

3.  राज्यातल्या विधीमंडळातल्या नेत्यांची जी चर्चा झाली, ती किमान समान कार्यक्रमाविषयी नाही.

4. आम्ही फक्त राजकीय सद्यस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत.

संबंधित - सोनिया गांधींच्या बैठकीनंतर पवारांनी पुन्हा सस्पेन्स वाढवला, शिवसेनेवर म्हणाले..

5. आमचा फक्त 54 आमदारांचा पक्ष आहे, आम्ही कशी सत्ता स्थापन करणार?

6. संजय राऊत काय बोलतात ते मी कसं सांगणार, त्यांना विचारा

7. कोणाबरोबर जायचं, नाही जायचं हे अजून निश्चित नाही. आमच्याकडे अजून 6 महिन्यांचा वेळ आहे.

8. कुठलाही निर्णय किंवा चर्चेआधी स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप अशा मित्रपक्षांबरोबर चर्चा आवश्यक

9. सध्या फक्त राष्ट्रवादीबद्दल बोलणार. शिवसेनेविषयी नाही.

10. भाजपबरोबर जाणार नाही हे निश्चित का, यावर पवार म्हणाले आम्ही निवडणूक त्यांच्याविरोधात लढलो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 18, 2019 07:04 PM IST

ताज्या बातम्या