नाशिक, 19 सप्टेंबर: जम्मू-काश्मीर संदर्भात असो की पाकिस्तान बाबत काँग्रेसचा गोंधळ मी समजू शकतो. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील शेजारचा (पाकिस्तान) देश चांगला वाटतो. त्यांना तिथले शासक चांगले वाटतात. दहशतवाद्यांची निर्मिती करणारा देश पवारांना चांगला वाटतो हे दुर्दैवी आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवारांवर टीका केली. राज्यातील सत्ताधारी भाजपच्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज नाशिक येथे झाला. यावेळी पंतप्रधान मोदींनी राज्यासह देशपातळीवरील विषयांना हात घातला.
मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
- गुजरात महाराष्ट्राचा लहान भाऊ
- मीही गुजरातचा सगळ्यात जास्त मुख्यमंत्री
- कारण जनतेसाठी समर्पण
- फडणवीस यांचं 5 वर्षांचं रिपोर्ट कार्ड बोलकं
- 100 दिवसात सरकारनं कामाची झलक दाखवली
- या 100 दिवसात धार आणी तलवार आहे
- भारताच्या वैश्विक ताकदीचा संदेश आहे
- अर्थव्यवस्था सुधारण्यास सुरुवात, रोजगार उपलब्ध करण्यासाठी ठोस उपाय
- 29 हजार कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली
- पशुधन वाचवण्यासाठी ठोस योजना
- 50 कोटी पशुधनांना टीका करण
- सेनेला सशक्त बनवण्यासाठी ठोस पावलं
- राफेल फायटर जेट लवकरच लष्करात दाखल
- चीफ ऑफ डिफेन्स चा निर्णय घेतला
- देश सुरक्षा आधीच्या सरकारांना महत्वाची वाटत नव्हती
- जवानांना बुलेट प्रुफ जॅकेट नव्हते
- आमच्या सरकारनं ही प्रक्रिया सुरू केली
- गेल्या 5 वर्षात मेक इन इंडियाला चालना दिली
- भारत हा जगातील आंतरराष्ट्रीय देशातील बुलेट प्रुफ जॅकेट बनवणारा देश
- देश सर्वप्रथम
- जम्मू काश्मीर, लडाख साठी शब्द दिला होता, तो पाळला
- एकच संविधान ही 130 कोटी भारतीयांची भावना
- देशाची एकता आणि अखंडता राखण्याची प्रतिज्ञा
- आता नवं काश्मीर बनवायचं आहे
- स्वर्ग बनवायचा आहे
- देशातील प्रत्येकानं नवं काश्मीर बनवण्यासाठी साथ द्या
- जम्मू काश्मीर मध्ये हिंसा करण्यासाठी सीमेपलीकडून प्रयत्न सुरू आहे
- हा सेवक मात्र विकास करण्यासाठी प्रतिबद्ध आहे
- यातही विरोधक राजकारण करताय
- देशाच्या एकतेसाठी देश एकत्र
- काँग्रेस, राष्ट्रवादी चे वरीष्ठ नेता मात्र काश्मीर निर्णयावरून माझ्यावर आरोप करताय
- अपप्रचार करताय, हे दुर्दैव
पंतप्रधान मोदींच कौतुक करत मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांवर हल्लाबोल, म्हणाले...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या महिनाभरापासून काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज नाशिकमध्ये झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. महाराष्ट्राचं अख्ख मंत्रिमंडळ, सर्व आमदार, खासदार या सभेला उपस्थित होते. राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन नुकतेच भाजपमध्ये आलेले उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पगडी घालून सत्कार केला. यावेळी सर्वच नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच कौतुक केलं. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वाचे लोकप्रिय नेते असं कौतुक करून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या भेटीत मोदींनी काय सल्ला दिला?, पाहा VIDEO
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा