पोलिसांच्या विनंतीनंतर ED कार्यालयात जाणार नाही, शरद पवारांची भूमिका

पोलिसांच्या विनंतीनंतर ED कार्यालयात जाणार नाही, शरद पवारांची भूमिका

पोलिसांच्या विनंतीनंतर ईडी कार्यालयात न जाण्याचा निर्णय घेतल्याचं शरद पवारांनी सांगितलं आहे.

  • Share this:

मुंबई, 27 सप्टेंबर : कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी मुंबई पोलिसांनी केलेल्या विनंतीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी समोर येत माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांच्या विनंतीनंतर ईडी कार्यालयात न जाण्याचा निर्णय घेतल्याचं शरद पवारांनी सांगितलं आहे.

शरद पवारांवर ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर मुंबईसह राज्यभरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. शरद पवार जर आज ईडी कार्यालयात गेले तर मुंबईत कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकतो, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं. त्यामुळे आता शरद पवारांनी ईडी कार्यालयात न जाण्याचा निर्णय घेतला.

शिवसेनेची पॉवर पवारांच्या पाठीशी!

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांची पाठराखण केली आहे. शरद पवार यांचं या घोटाळ्यात कधीही नाव आलं नव्हतं, मग आता गुन्हा का दाखल करण्यात आला, असा सवाल त्यांनी केला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यानंतर आता शिवसेनेनंही शरद पवारांना क्लीन चिट दिल्याने राष्ट्रवादीला दिलासा मिळाला आहे.

काँग्रेसही आक्रमक

शरद पवारांवर ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर काँग्रेसने पहिल्यांदाच आक्रमक भूमिका घेतली आहे. याआधी काँग्रेसच्या राज्यातील नेतृत्वाने पुढे येत अशी थेट भूमिका घेतली नव्हती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून सत्ताधाऱ्यांना आव्हान देणार असल्याचा संदेश काँग्रेसकडून देण्याचा प्रयत्न आता होत आहे.

VIDEO: '...तर आम्ही सहन करणार नाही', पवारांच्या मुद्द्यावरुन धनंजय मुंडे आक्रमक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 27, 2019 01:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading