मी शेतकरी आहे, म्हणून माझा या संपाला पाठिंबा- शरद पवार

मी शेतकरी आहे, म्हणून माझा या संपाला पाठिंबा- शरद पवार

सामान्य जनतेला त्रास होईल असं कोणतंही कृत्य या संपात करू नये, अशी सूचनाही पवारांनी केलीये. साम दाम दंड भेद या मुख्यमंत्र्यांच्या गाजलेल्या विधानावरूनही पवारांनी टीका केली.

  • Share this:

04 जून : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकरी संपाला पाठिंबा जाहीर केलाय. मी स्वतः शेतकरी आहे, म्हणून माझा या संपाला पाठिंबा आहे.  पण सामान्य जनतेला त्रास होईल असं कोणतंही कृत्य या संपात करू नये, अशी सूचनाही पवारांनी केलीये. साम दाम दंड भेद या मुख्यमंत्र्यांच्या गाजलेल्या विधानावरूनही पवारांनी टीका केली.

पवार नेमकं काय म्हणाले?

मी शेतकरी आहे, म्हणून माझा या संपाला पाठिंबा आहे. सामान्य जनतेला त्रास होईल असं काम या संपात कुणीही करू नये. राज्य आणि केंद्र सरकारनं दिलेली आश्वासनं पाळली नाहीत. साम, दाम, दंड, भेदची अंमलबजावणी करणारं हे सरकार आहे. कुठल्याही प्रकारे निवडणुका जिंकण्याचा सरकारचा मानस आहे. पालघरमध्ये भाजपचा विजय झाला असला तरी देशभरात 11 पैकी 2 जागांवरच त्यांचा विजय झालाय. लोकमानस काय आहे हे ओळखून सर्वांनी एकत्र यावं.

First published: June 4, 2018, 2:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading