मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

प्रकाश आंबेडकरांचा पवारांबाबत गौप्यस्फोट, महाविकासआघाडीत 'उद्रेक' होणार?

प्रकाश आंबेडकरांचा पवारांबाबत गौप्यस्फोट, महाविकासआघाडीत 'उद्रेक' होणार?

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीला दोनच दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये युती झाली, पण ठाकरे-आंबेडकर युतीमुळे महाविकासआघाडीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Shreyas

मुंबई, 25 जानेवारी : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीला दोनच दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये युती झाली, पण ठाकरे-आंबेडकर युतीमुळे महाविकासआघाडीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे, याला कारण आहे प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांबाबत केलेला गौप्यस्फोट. शरद पवार हे भाजपसोबतच आहेत, असं खळबळजनक विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

'शरद पवारांबाबतच माझं आधीपासूनचं मत कायम आहे. शरद पवार हे भाजपबरोबर आहेत. तुम्हाला लवकरच कळेल, तुम्ही डोळेझाक करून चालला आहात माझ्यासाठी हे अजिबात धक्कादायक नाही', असं प्रकाश आंबेडकर एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाले.

शिंदेंनंतर मित्रांनीच ठाकरेंना खिंडीत गाठलं! पवार-आंबेडकरांच्या मनात नेमकं काय?

याआधी संध्याकाळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्येही प्रकाश आंबेडकर यांनी आणखी एक विधान केलं, त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. आपली युती ही ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहे, महाविकासआघाडीसोबत नाही. आपल्याला महाविकासआघाडीसोबत युती करण्याची इच्छा नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. तसंच शिवसेना-वंचितची युती झाली तर सरकार येईल, असा विश्वासही प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे. दोनच दिवसांपूर्वी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर महाविकासआघाडीचा भाग असल्याचं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं होतं.

प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या या गौप्यस्फोटानंतर आता शिवसेना तसंच राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

First published:

Tags: Prakash ambedkar, Sharad Pawar, Uddhav Thackeray