सरकारचा नाकर्तेपणा लपवण्याची जबाबदारी शरद पवारांवर,'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत फडणवीसांचा हल्लाबोल

राज्यात शरद पवार यांच्या सारखा जानकार नेता कुणीच नाही. पण, पवार हे सरकारला कसे वाचवता येईल एवढेच बोलत आहे.

राज्यात शरद पवार यांच्या सारखा जानकार नेता कुणीच नाही. पण, पवार हे सरकारला कसे वाचवता येईल एवढेच बोलत आहे.

  • Share this:
    उस्मानाबाद, 20 ऑक्टोबर : 'तुम्ही जर राजकीय बोलला, तर मला राजकीय बोलावे लागणार आहे' असं म्हणत भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लाव रे तो व्हिडीओ म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसंच, संवदेनशीलता दाखवून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली. देवेंद्र फडणवीस हे उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे भागाची पाहणी करण्यासाठी पोहोचले आहे. त्याआधी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्या जुना व्हिडीओ भर पत्रकार परिषदेत दाखवला. या व्हिडीओमध्ये उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी कोरडवाहु शेतीसाठी हेक्टरी 25 हजार रुपये आणि बागायतीसाठी 50 हजार रुपये हेक्टरी मदतीची मागणी केली होती. त्यांचा हा व्हिडीओ दाखवून आता तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहात, तुम्ही जी वारंवार मागणी करत होता, आता ती पूर्ण करण्याची वेळ आहे, असा सणसणीत टोला फडणवीस यांनी लगावला. 'राज्यात शरद पवार यांच्या सारखा जाणकार नेता कुणीच नाही. पण, पवार हे सरकारला कसे वाचवता येईल एवढेच बोलत आहे. शरद पवार हे सरकारचा नाकर्तेपणा झाकून ठेवत आहे, अशी टीकाही फडणवीस यांनी केली. 'राज्यात काही संकट आले की, नेहमी केंद्राकडेच बोट दाखवण्याचा प्रकार सुरू आहे. पण खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच फोन करून मुख्यमंत्र्यांकडून माहिती जाणून घेऊन मदतीचे आश्वासन दिले केंद्र सरकारची मदत कधी येते हे पवार यांना माहिती आहे. केंद्राच्या समितीचे प्रमुख हे गृहमंत्री, अर्थमंत्री असतात. केंद्राकडून एनडीआरएफसाठी निधी दिला असतो, त्याचा वापर करता येतो. त्यामुळे राज्य सरकारने कारणे न दाखवता तातडीने मदत केली पाहिजे', अशी मागणी ही फडणवीसांनी केली. 'शरद पवारांनी आवश्यकता असेल तर कर्ज काढलं पाहिजे असा चांगला सल्ला दिला आहे. कर्ज काढणे हे काही पाप नाही. आपले जे बजेट आहे. त्यातील 70 ते 80 टक्के रक्कम कर्जातून येते. आपल्याला 1 लाख 20 हजार कोटींचं कर्ज काढता येते. आतापर्यंत 60 हजार कर्ज घेण्यात आले आहे. त्यामुळे कर्ज काढून शेतकऱ्यांना मदत करता येईल', असंही फडणवीस यांनी सांगितले. 'राज्याला जसा जीएसटी येतो तसा जीएसटी केंद्रालाही मिळत नाही. मार्चपर्यंतचं अनुदान 20 हजार कोटी रुपयांपर्यंत मिळालं आहे. केंद्र सरकार कर्ज काढून राज्यांना जीएसटीचे पैसे देत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने जर पदरचा पैसा खर्च केला तर तो पैसा परत मिळणार आहे.  पण हात झटकण्यात तिन्ही पक्ष तरबेज आहे', अशी टीकाही फडणवीस यांनी केली. 'तुम्ही जर मी राजकीय बोलला, तर मला राजकीय बोलावे लागणार आहे.  मला राजकारणात रस नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर मोठी जबाबदारी आहे. राजकीय भाष्य टाळून संवदेनशीलता दाखवून शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, अशी विनंती आम्ही सरकारकडे करतो', असं सांगत फडणवीसांनी ठाकरे सरकाराला बजावले आहे. 'शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी मी केंद्र सरकारला आधी विनंती केली आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोललो आहे. राज्य सरकारकडून मदत आल्यावर योग्य ती मदत पाठवण्यात यावी. मी अमित शहा यांच्याशी बोललो काय, किंवा उद्धव ठाकरे बोलले तरी मदत ही तेवढीच मिळणार आहे. राज्यातला दौरा पूर्ण केल्यानंतर अमित शहा यांच्याकडे पूर्ण माहिती देणार आहे, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.
    Published by:sachin Salve
    First published: