Home /News /maharashtra /

Supriya Sule : शरद पवार सरकार वाचवण्यात व्यस्त तर सुप्रिया सुळे वारकऱ्यांसाठी पिठलं भाकरी बनवण्यात व्यस्त

Supriya Sule : शरद पवार सरकार वाचवण्यात व्यस्त तर सुप्रिया सुळे वारकऱ्यांसाठी पिठलं भाकरी बनवण्यात व्यस्त

खासदार सुप्रिया सुळे (ncp mp supriya sule) मात्र तुकाराम महाराज पालखी (tukaram maharaj palkhi) सोहळ्यातील वारकऱ्यांच्या भोजनासाठी पिठलं भाकरी करण्यात व्यस्त

  मुंबई, 25 जून : राज्यात राजकीय घडामोडी घडत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे (ncp mp supriya sule) मात्र तुकाराम महाराज पालखी (tukaram maharaj palkhi) सोहळ्यातील वारकऱ्यांच्या भोजनासाठी पिठलं भाकरी करण्यात व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे बारामती लोकसभा (baramati loksabha)) मतदारसंघ च्या खासदार सुप्रिया सुळे ह्या नेहमीच राज्याच्या राजकारणात सक्रिय असल्याचे दिसून येते शिवसेना आमदारांनी (shivsena mla) केलेली बंडखोरी राज्यात चर्चेचा विषय बनत असताना महाविकास आघाडी (mahavikas aghadi) मधील महत्वाचा घटक पक्ष असणारा राष्ट्रवादी काँग्रेस मात्र सावध भूमिका घेताना दिसत आहे.

  महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना अजित पवारांची नाराजी दूर करण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या सुप्रिया सुळे मात्र महाविकास आघाडी सरकार धोक्यात असताना शनिवारी दुपारी यवत गावातील भैरवनाथ मंदिरात  पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या जेवण्याच्या सोयीसाठी पिठलं भाकरी करताना व्यस्त असल्याचे दिसून आले आहे.

  हे ही वाचा : 'XXला पाय लावून का पळाला, आता बकरी सारखे बेबे करू नका', संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना सुनावलं

  राज्यातील परिस्थीती काय आहे जाणून घ्या..

  राज्यात अभुतपूर्व असा राजकीय संघर्ष निर्माण झाला आहे. शिवसेनेतील आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामिल झाल्यामुळे शिवसैनिक कमालीचे संतापले आहे. ठिकठिकाणी आमदारांचे कार्यालय टार्गेट केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस अलर्ट झाली आहे. मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. सर्व राजकीय पक्षांच्या कार्यालयांना सुरक्षा दिली जाणार आहे. एवढंच नाहीतर सोशल मीडियावर सुद्धा पोलिसांचे विशेष टीम लक्ष ठेवणार आहे. हिंसक बॅंनर पोस्टर तात्काळ काढण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहे. राज्यात सध्या राजकीय परिस्थिती आहे त्यानुसार हे आदेश जारी केले आहे. त्याचबरोबर सर्व पक्षांना आणि कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी शांततेचे आवाहन केलं आहे.

  हे ही वाचा : मुंबई हायअलर्टवर, राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून नवे आदेश जारी

  दरम्यान, राज्यात ठिकठिकाणी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या कार्यालयांवर हल्ले केले जात आहे. आज सकाळी शिंदे समर्थक आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या पुण्यातील कार्यालयाची संतप्त शिवसैनिकांनी तोडफोड केली. पुण्यातील बालाजी नगर भागात सावंत यांचे बंधू प्रा. शिवाजी सावंत यांच्या भैरवनाथ साखर कारखान्याचे कार्यालय आहे. या कार्यालयाला शिवसैनिकांनी लक्ष्य केलं. या तोडफोडीनंतर तानाजी सावंत यांनी फेसबुकवर पोस्ट करून शिवसैनिकांचा इशारा दिला.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: NCP, Sharad Pawar (Politician), Shiv Sena (Political Party), Supriya sule, Uddhav Thackeray (Politician)

  पुढील बातम्या