शपथविधी सोहळ्यात शरद पवारांचा अपमान : राष्ट्रपती भवनानं दिलं हे स्पष्टीकरण

शपथविधी सोहळ्यात शरद पवारांचा अपमान : राष्ट्रपती भवनानं दिलं हे स्पष्टीकरण

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यात शरद पवारांचा अपमान झाल्यामुळे ते शपथविधी सोहळ्याला थांबले नव्हते. पण शरद पवारांसाठी VVIP आसनच ठेवलं होतं, असं स्पष्टीकरण राष्ट्रपती भवनाने दिलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 5 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यात शरद पवारांचा अपमान झाल्यामुळे ते शपथविधी सोहळ्याला थांबले नव्हते. या मानापमान नाट्यावरून बरंच राजकारण झालं. पण शरद पवारांसाठी VVIP आसनच ठेवलं होतं, असं स्पष्टीकरण राष्ट्रपती भवनाने दिलं आहे.

शरद पवारांसाठी पहिल्या रांगेतलं VVIP आसन ठेवलेलं होतं. याच रांगेत वेगवेगळ्या पक्षांचे वरिष्ठ नेते बसलेले होते, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद याचे प्रेस सेक्रेटरी अशोक मलिक यांनी म्हटलं आहे.

शरद पवारांच्या ऑफिसमधल्या कुणाचा तरी गोंधळ झाल्यामुळे हा गैरसमज झाला असावा. त्यांनी VVIP मधल्या फक्त V वरून पाचवी रांग असं मानलं असावं, असं ट्वीट अशोक मलिक यांनी केलं.

प्रसारमाध्यमांमध्ये याबद्दल उलटसुलट बातम्या आल्या. याबद्दल राष्ट्रपती भवनाच्या कार्यालयाकडेही विचारणा झाली. त्यामुळेच याचं स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या शपथविधी सोहळ्यात वेगवेगळ्या पक्षांचे नेते आणि प्रमुख पाहुणे उपस्थित होते. बिमस्टेक देशांच्या संघटनेचे सदस्य असलेल्या राष्ट्रप्रमुखांना या शपथविधीचं निमंत्रण होतं. पाकिस्तान या संघटनेचा सदस्य नाही. त्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे या सोहळ्यात उपस्थित नव्हते.

===================================================================================================

VIDEO : राजकीय हेतूने बारामतीचं पाणी बंद? गिरीश महाजनांचा मोठा खुलासा

First published: June 5, 2019, 6:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading