Home /News /maharashtra /

'पवारसाहेबांनी अनेक उन्हाळे-पावसाळे बघितले; बंडखोर परत येणारच', राष्ट्रवादीच्या आमदाराला विश्वास

'पवारसाहेबांनी अनेक उन्हाळे-पावसाळे बघितले; बंडखोर परत येणारच', राष्ट्रवादीच्या आमदाराला विश्वास

सत्तेत असू अथवा नसू आपल्या मतदार संघात जा आणि जनतेचं काम करत राहा, असे निर्देश शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना दिले आहेत

    नेहाल भुरे, प्रतिनिधी भंडारा 26 जून : सध्या महाराष्ट्रात मोठं राजकीय संकट आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारही सध्या धोक्यात आहे. शिवसेना आणि शिवसेना समर्थक अपक्ष असे जवळपास 50 आमदार सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीमध्ये आहेत. या सर्वा आमदारांनी बंड पुकारला आहे. त्यामुळे अनेक मतदारसंघामधील आमदार सध्या गायब आहेत. या परिस्थितीमध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार आपल्या आपल्या मतदारसंघात परतले आहेत. 'आना ही पडेंगा चौपाटी में...' संजय राऊतांचा आठवले स्टाईल शिंदे गटाला खोचक टोला सत्तेत असू अथवा नसू आपल्या मतदार संघात जा आणि जनतेचं काम करत राहा, असे निर्देश शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना दिले आहेत.. विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी गेलेले राष्ट्रवादी आमदार शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे मुंबईत अडकले गेले होते. मात्र आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या आदेशानंतर राष्ट्रवादीचे आमदार आपल्या मतदारसंघात परतण्यास सुरुवात झाली आहे. भंडारा जिल्ह्याचे मोहाडी तुमसर विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे हे सुद्धा मतदारसंघात परतले आहेत. यावेळी सत्तेत असू अथवा नसू आपल्या मतदार संघात परत जाऊन जनतेचे काम करत राहण्याचे निर्देश शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना बैठकीत दिले असल्याची माहिती राजू कारमोरे यांनी दिली आहे. राज्यपाल इज बॅक, कोरोनावर मात करून कोश्यारी आजपासून राजभवनावर, राजकीय घडामोडींना येणार वेग सध्या खरीप हंगाम सुरू आहे.आपल्या मतदार संघातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्या, जनतेसोबतची नाळ जोडून ठेवा असे अनेक निर्देश दिल्याची माहिती आमदार राजू कारमोरे यांनी दिली आहे. यावेळी आमच्या साहेबांनी अनेक उन्हाळे- पावसाळे बघितले आहे, त्यामुळे बंडख़ोर आमदार परत येणार असल्याने महाविकास आघाडी सरकार आपले 5 वर्ष पूर्ण करणार असल्याचा विश्वास आमदार राजू कारमोरे यांनी व्यक्त केला आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: NCP, Sharad Pawar (Politician)

    पुढील बातम्या