नांदेड, 20 फेब्रुवारी : लोकसभा निवडणूक जशी जवळ येतेय तसं राजकारण तापत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाल्यानंतर त्यांची पहिलीच जाहीर सभा बुधवारी नांदेडमध्ये झाली. या सभेला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेस- राष्ट्रवादीचे सर्व दिग्गज उपस्थित होते. पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली ती योग्य नव्हती. हे सरकार दुबळ आहे अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
छपन्न इंचाची छाती असतानाही दररोज जवान मारले जात आहेत. या आधी इंदिरा गांधी, लालबहादुर शास्त्री, शंकरराव चव्हाण यांनी अतिशय समर्थपणे परिस्थिती हाताळली आणि पाकिस्तानला दणका दिला. इंदिरा गांधी यांनी फक्त इतिहासच बदलला नाही तर भूगोलही बदलला.
नरेंद्र मोदी यांचं सरकार निष्क्रिय असून त्यांनी नागरिकांना वाऱ्यावर सोडलं असा आरोपही त्यांनी कोला. नोटबंदी करून मोदींनी शेतकऱ्यांना संपवलं, जीएसटी लागू करून व्यापाऱ्यांना संपवलं ही यांची कामगिरी आहे. मनमोहनसिंग पंतप्रधान असताना शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी दिली होती. सर युती सरकारने कर्जमाफीच्या नावावर शेतकऱ्यांची थट्टा केली असा आरोपही त्यांनी केला.
सुप्रीम कोर्ट, आरबीआय, सीबीआय, निवडणुक आयोग अशा सर्व संस्थांवर या सरकारने हल्ला केला. या संस्था मोडून काढल्या असा आरोपही पवारांनी केला. मराठ्यांना, धनगरांना आरक्षणाचं आश्वासन दिलं पण सरकारने फसवणूक केली अशी टीकाही त्यांनी केली.
VIDEO : उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना विचारलं, हाऊज् द जोश?