शरद पवार 'इन अ‍ॅक्शन', मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी केली फोनवरून चर्चा; मोठा निर्णय होण्याची शक्यता

शरद पवार 'इन अ‍ॅक्शन', मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी केली फोनवरून चर्चा; मोठा निर्णय होण्याची शक्यता

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे.

  • Share this:

मुंबई, 4 एप्रिल : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांना मोठ्या संकटाला सामना करावा लागत आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. पिवळ्या रेशनिंग कार्डसोबतच राज्यातील केशरी रेशनिंग कार्ड धारकांना येत्या आठवड्यात धान्य उपलब्ध करून देण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.

राज्य सरकारने जर केशरी रेशन कार्डधारकांनाही धान्य उपलब्ध करून दिल्यास राज्यावर साधारण 300 कोटी रूपये अतिरिक्त बोजा पडणार आहे. मात्र राज्यात रेशनिंग धान्य उपलब्ध होत नसल्याने लोकांमध्ये नाराजी वाढत आहे. त्यामुळे सरकार हा निर्णय घेण्याच्या मानसिकतेत असल्याचं दिसत आहे.

छगन भुजबळांनीही घेतली शरद पवारांची भेट

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केशरी रेशनकार्डधारकांना रेशनचे धान्य मिळावे त्यासोबतच अन्न व नागरी पुरवठा विभागाने केलेल्या उपाययोजनांबाबत या भेटीत चर्चा झाली आहे. शरद पवार यांचे मुंबई येथील निवासस्थान सिल्व्हर ओक इथं ही भेट झाली.

देवेंद्र फडणवीसांनीही केली होती मागणी

'आगामी 3 महिन्यांचे धान्य रेशन दुकानातून देताना केंद्र सरकारने कोणतीही अट ठेवलेली नाही. मात्र राज्य सरकारने अनेक अटी टाकल्या आहेत. आधी विकत मिळणारे रेशन घेतले तरच पुढचे धान्य मोफत मिळेल, ज्यांनी नियमित धान्य घेतले, त्यांनाच ते मिळेल, अशा स्वरूपाच्या या अटी आहेत,' असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या धोरणाबाबत नाराजी व्यक्त केली होती.

'माझी राज्य सरकारला नम्र विनंती आहे की त्यांनी या अटी मागे घ्याव्यात. आज गरिबांना धान्य मोफत मिळणे अतिशय आवश्यक आहे. रेशन कार्ड असो वा नसो, धान्य देण्याचेच निर्णय अन्य राज्यांनी सुद्धा घेतले आहेत,' असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 4, 2020 12:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading