शरद पवारांच्या सत्काराला राजकीय शेरेबाजींची जुगलबंदी

शरद पवारांच्या सत्काराला राजकीय शेरेबाजींची जुगलबंदी

औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

  • Share this:

30 जुलै : औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. पवारांच्या नागरी सत्कारासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकुरकर, अशोक चव्हाण, रावसाहेब दानवे, धनंजय मुंढे, पंकजा मुंढे यांच्यासह सर्वपक्षीय नेते आमदार खासदार आवर्जून उपस्थित होते.

प्रमुख नेत्यांनी आपल्या भाषणात शरद पवारांनी पक्षभेद विसरून सगळ्यांना मार्गदर्शन केल्याची भावना व्यक्त केली. राजकारणात त्यांनी आदर्श निर्माण केल्याची भावना व्यक्त केलीय. नितीन गडकरी यांनी मात्र शरद पवार राजकारणात काय करतील याचा अंदाज कुणालाच आला नाही आणि येणार नाही असं मत व्यक्त केलंय. त्याला उत्तर देतांना शरद पवारांनी आकस मनानं राजकारण केलं नाही आणि करणारही नाही अशी ग्वाही देवून टाकली.

या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी चौफेर टोलेबाजी केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह त्यांच्या आणि पवारांच्या मैत्रीवरून मीडियात सुरू असलेल्या चर्चेवरही त्यांनी मार्मिक टिप्पणी केली. महाराष्ट्र मीडियाच्या लिखाणामुळे महाराष्ट्र बिघडलाही नाही आणि सुधारलासुध्दा नाही अशी टिपणी नितीन गडकरी यांनी केली.

आमच्या पक्षात कुणाचाही आदेश चालत नाही. पक्ष आदेश काय असतो तो अशोक चव्हाण यांना माहीत आहे अशी कोपरखळी नितीन गडकरी यांनी  काँग्रेस पक्षाला मारली. त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष असतानाची त्यांची अवस्था सांगितली. द्रौपदीची अवस्था चांगली होती कारण तिला पाच जणांचेच ऐकावे लागत होते, मात्र मला एकशे पाच जणांचे  ऐकून निर्णय घ्यावे लागायचे,  हा किस्सा  ऐकून  एकच हशा पिकला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 30, 2017 02:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading