नागपूरच्या पैलवानाशी भेट झाली का? शरद पवारांनी मिश्किल हास्य करत दिलं उत्तर

नागपूरच्या पैलवानाशी भेट झाली का? शरद पवारांनी मिश्किल हास्य करत दिलं उत्तर

  • Share this:

मुंबई, 15 नोव्हेंबर : विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला होता. समोर कुणी पैलवानच नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली होती. त्यावर शरद पवारांनीही आम्ही 'अशां'सोबत कुस्ती खेळत नाही, असं म्हणत पलटवार केला होता. याबाबतच आता शरद पवार यांना पत्रकार परिषदेत पुन्हा प्रश्न विचारण्यात आला.

'निवडणुकीनंतर तुमची नागपूरच्या पैलवानाशी भेट झाली होती का,' असा प्रश्न आजच्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना शरद पवार यांनी मिश्किल हास्य केलं आणि म्हणाले की, 'आता परत कशाला ते विचारता.' यावेळी बोलताना शरद पवार यांनी परतीच्या पावसामुळे झालेलं शेतकऱ्यांचं नुकसान आणि सध्याच्या राजकीय स्थितीवरही भाष्य केलं आहे.

'काँग्रेसच्या दिल्लीतल्या प्रतिनिधींशी चर्चा झाली आहे. किमान समान कार्यक्रमाची चर्चा पूर्ण झाल्यावर विस्ताराने बोलणार आहे. कालच्या दोन बैठकीत काय झालं त्याची माहिती घेईल. काँग्रेस - राष्ट्रवादी नेहमी धर्मनिरपेक्षतेची कास धरतात,' असं म्हणत त्यांनी संभाव्य महाशिवआघाडीबाबत भाष्य केलं आहे.

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर शरद पवार आक्रमक

परतीच्या पावसामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी विदर्भातील शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानीची पाहणी केली. तसंच शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी, यासाठी आपण दिल्लीत जावून केंद्र सरकारकडे मागणी करणार आहे. अर्थ आणि कृषी खात्यातील लोकांशी याबाबत आपण बोलणार असल्याचं पवारांनी स्पष्ट केलं.

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर काय म्हणाले शरद पवार?

- काँग्रेस -राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचा मुद्दा आहे

- सरसकट पंचनामे करण्यासाठी आमचा आग्रह

- सरकारनं यात लक्ष घालावं

- शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेला का यासाठी प्रयत्न कऱणार

- 18 तारखेला संसदेचं अधिवेशन सुरू होणार आहे. तेव्हा शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर एक बैठक बोलवावी असा प्रयत्न करू

- काही ठिकाणी इथल्यापेक्षा परिस्थिती गंभीर, शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान

- साठ ते सत्तर टक्के संत्री गळून पडली

- संत्र्याचा एक बहर नष्ट झाला

- संत्रा, मोसंबी, कपाशीवर पावसाचा परिणाम

राज्यातल्या सत्ता संघर्षावर हे मीम्स तुम्ही पाहिलेत का? पाहा हा VIDEO

Tags:
First Published: Nov 15, 2019 12:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading