शेतकरी मोर्चाला शरद पवार यांचा बिनशर्त पाठिंबा

शेतकरी मोर्चाला शरद पवार यांचा बिनशर्त पाठिंबा

मुंबईत शेतकऱ्यांच्या होणाऱ्या समारोप समारंभाला पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे उपस्थित राहतील अशी माहिती खुद्द पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिलीये.

  • Share this:

11 मार्च : शिवसेना, मनसे पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने देखील शेतकरी मोर्चाला बिनशर्त पाठिंबा दिलाय. मुंबईत शेतकऱ्यांच्या होणाऱ्या समारोप समारंभाला पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे उपस्थित राहतील अशी माहिती खुद्द पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिलीये.

शरद पवार रोहा येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रायगड जिल्हा मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. या कार्यक्रमात शरद पवार यांच्या संसदीय कार्यपध्दतीची पन्नास वर्ष पूर्ण झाल्या बदल त्यांचा रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नागरी सत्कार सोहळा करण्यात आला.

यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार सुरेश लाड, निरंजन डावखरे, अनिल तटकरे उपस्थित होते.

First published: March 11, 2018, 4:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading