OPINION : गावापासून ते दिल्ली दरबार... सगळीकडे पवार 'पॉवर'

OPINION : गावापासून ते दिल्ली दरबार... सगळीकडे पवार 'पॉवर'

महाराष्ट्राच्या राजकारणात पवार कुटुंबियांचंचं प्रमाण जास्त होऊ नये, अशी टिप्पणी शरद पवारांनी केली. पण तरीही राजकारणात घराणेशाही वाढीला लागू नये म्हणून त्यांच्याच पक्षात त्यांनी किती प्रयत्न केले हा प्रश्न उरतोच.

  • Share this:

महेश विजापूरकर, फर्स्टपोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या माघारीबद्दल देशभरात चर्चा रंगली. शरद पवार हे महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणामधले एक मातब्बर नेते असल्याने या निवडणुकीतला तो सर्वात मोठा चर्चेचा मुद्दा बनला.

शरद पवार हे सोशल इंजिनिअरिंगमधली समीकरणं जुळवण्यात मुरब्बी असलेले नेते. राजकारणात कायमच दबदबा राखणारे पवार महाराष्ट्राचे तीनदा मुख्यमंत्री झाले. 1970 मध्ये त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून स्वत:चा पक्ष काढला तेव्हापासूनच त्यांचं राजकारणातलं वजन कायम आहे. त्याआधी 'मराठा स्ट्राँगमॅन' अशी त्यांची ओळख होती.ते यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय वारसदार होते पण त्यांचं कर्तृत्व तरीही राज्यापुरतंच मर्यादित होतं.

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं राजकारणावर वर्चस्व असलं तरी आता निवडणुकीच्या राजकारणात सक्रीय पुढाकार राहवा यासाठी त्यांच्याच पक्षातले लोक त्यांना या लोकसभा निवडणुकीतही उभं राहण्याची विनंती करत होते.2009 मध्ये शरद पवारांनी ज्या माढा मतदारसंघातून घवघवीत यश मिळवलं तोच मतदारसंघ त्यांच्यासाठी नक्की केला गेला.

महाराष्ट्रातल्या घराणेशाहीमध्ये शरद पवार यांचं कुटुंब आघाडीवर आहे, असं बोललं जातं.आपल्या कुटुंबातले 2 उमेदवार जर रिंगणात असतील तर तिसरा उमेदवार नको, असं म्हणत शरद पवारांनी माढामधून माघार घेतली.

महाराष्ट्रातल्या मातब्बर नेत्याने लोकसभा निवडणुकीतून माघार घेणं हा काही योग्य राजकीय निर्णय म्हणता येणार नाही. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचं नेतृत्व ते करतात. ही आघाडी शिवसेना - भाजप युतीला टक्कर देण्याची भाषा करत असतानाच त्यांनी हा माघारीचा निर्णय घेतला आहे.

सर्वात मोठं राजकीय कुटुंब

महाराष्ट्राच्या राजकारणात पवार कुटुंबियांचंचं प्रमाण जास्त होऊ नये, अशी टिप्पणी शरद पवारांनी केली. घराणेशाहीच्या परंपरेबद्दल त्यांनी केलेलं हे विधान सूचक आहे. पण तरीही राजकारणात घराणेशाही वाढीला लागू नये म्हणून त्यांच्याच पक्षात त्यांनी किती प्रयत्न केले हा प्रश्न उरतोच.

महाराष्ट्रात घराणेशाही ही फक्त राष्ट्रवादी काँग्रेसपुरतीच मर्यादित नाही. ती सगळ्याच पक्षात आहे पण तिकीटवाटप करताना एक पक्षप्रमुख म्हणून त्यांना ही घराणेशाहीची परंपरा मोडण्याची चांगली संधी होती. तेव्हा त्यांनी याबद्दल पावलं उचलली नाहीत हेही लक्षात घ्यायला हवं.

राजकारणात तरुणांना प्राधान्य द्यायला पाहिजे असं जेव्हा ते म्हणतात तेव्हा हे तरुण फक्त त्यांच्याच कुटुंबातून येतात का हा प्रश्न उरतो. उदाहरणार्थ माजी उपमख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार हा मावळमधून लोकसभा निवडणूक लढणार आहे. काही महिन्यांतच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांचा मोठा भाऊ राजेंद्र पवार यांचा मुलगा रोहित पवार यालाही रिंगणात उरवणार असल्याचं बोललं जातंय.

मुलायमसिंह यादव आणि पवार

शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे यांच्यासाठी बारामतीचा मतदारसंघ राखून ठेवलेला आहेच. याशिवाय शरद पवार हेही 2020 पर्यंत राज्यसभेचे सदस्य असणार आहेत. हे सगळं पाहता, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात पवार कुटंबियांचाच किती वर्षं दबदबा राहील हे लक्षात येतं. महाराष्ट्रातलं दुसरं कोणतंही कुटुंब इतकी दशकं राजकारणात नसेल.

'शरद पवार जेव्हा निवडून आले तेव्हा मुख्यमंत्री प्रायमरी स्कूलमध्ये असतील'

पवार कुटुंबीयांची तुलना करायची झालीच तर ती उत्तर प्रदेशच्या राजकारणात विस्तारलेल्या मुलायमसिंग यादव यांच्या कुटुंबाशी करता येईल.

आपण राजकारणातून निवृत्त होतोय, असा सूर जरी शरद पवार लावत असले तरी ते फक्त लोकसभेची निवडणूक लढवणार नाहीत एवढाच त्याचा अर्थ होतो. राज्यसभेचे सदस्य या नात्याने ते देशाच्या राजकारणात सक्रीय राहणार आहेत.

गल्ली ते दिल्ली

राज्यसभेची खासदारकी, राष्ट्रवादीचं अध्यक्षपद यासोबतच त्यांचं अगदी छोट्याछोट्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारावरही बारीक लक्ष असतं.

शरद पवारांनी 2013 मध्ये निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेण्याचं जाहीर केलं पण त्यांचेच जवळचे सहकारी नेते प्रफुल्ल पटेल यांच्या मते, ही निवृत्ती फक्त माढामधून न लढण्याबद्दलच होती.

तरीही यावेळी शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं. त्यांना ही निवडणूक लढवायची होती हे स्पष्ट दिसतं पण नातवाच्या मावळमधल्या उमेदवारीसाठीच त्यांनी इथून माघार घेतली हे आपण लक्षात घ्यायला हवं.

(लेखात व्यक्त झालेले मत हे लेखकाचं वैयक्तिक मत आहे. त्या मतांशी 'न्यूज18 लोकमत' सहमत असेलच असे नाही.)

=================================================================================================

First published: March 13, 2019, 9:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading