राज्य शिखर बँकप्रकरणी गुन्हा दाखल : शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

राज्य शिखर बँकप्रकरणी गुन्हा दाखल : शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची बातमी आल्यानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना शरद पवार यांनी या गुन्ह्याशी संबंध नाही, असं सांगितलं आहे.

  • Share this:

मुंबई, 24 सप्टेंबर : राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची बातमी आल्यानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना शरद पवार यांनी या गुन्ह्याशी संबंध नाही, असं सांगितलं आहे. ED ने शरद पवारांवर गुन्हा नोंदवल्यामुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला आहे.  महाराष्ट्र राज्य सहकारी शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी  (bank scam Money Laundering Case) शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवारांसह (Ajit Pawar) सर्व माजी संचालकांवर ED Enforcement Directorate ने गुन्हा दाखल केला. यासंदर्भात शरद पवार यांना विचारलं असता ते म्हणाले, "माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती नाही. बँकेकडून मला फोन आला, त्यात माझं नाव नसल्याची माहिती मला मिळाली." राज्य शिखर बँकेच्या घोटाळ्यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, "मी राज्य सहकारी बँकेशी संबंधित नव्हतो. मी कधीही बँकेचा संचालक नव्हतो. कुठल्याही बँकेच्या संचालक मंडळावर मी कधी नव्हतो. मी बँकेच्या निवडणुकीलासुद्धा कधी उभा राहिलो नव्हतो. ज्या संस्थेशी माझा कसलाही संबंध नाही, त्याच्यातल्या घोटाळ्यात मला गोवण्यात येत असेल तर काय बोलणार."

"या बँकेच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेशी माझा कधीही संबंध नव्हता. आता जी तक्रार दाखल करण्यात आली आहे, त्यात कर्ज देण्याच्या अनियमितपणाबद्दल तक्रार केली होती. कर्ज देण्याच्या प्रक्रियेशी माझा कसा संबंध? तरीही माझ्यावर केस करण्याविषयी निर्णय घेतला असेल तर धन्यवाद देतो. मी ज्या बँकेचा सभासदसुद्धा नाही. मग त्या बँकेच्या घोटाळ्याच्या गुन्ह्यात माझाही सहभाग कसा नोंदवला?" असा सवाल त्यांनी केला.

संबंधित -निवडणुकीच्या आधी EDचा दणका, शरद पवार आणि अजित पवारांवर गुन्हा दाखल!

आता आम्ही प्रचाराच्या निमित्ताने बाहेर पडत आहोत. लोकांमध्ये जात आहोत आणि लोकांचा आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. निवडणुका तोंडावर असताना हा गुन्हा दाखल केलाय याचा उचित अनुचित परिणाम कोणावर होईल हे सांगायची गरज नाही.

वाचा - काँग्रेस कार्यकर्त्याचं सोनियांना रक्ताने पत्र, राज्यात 'या' पक्षाबर आघाडी नको

राजकीय हेतूने गुन्हा नोंदवला जात असेल असं म्हणायला वाव आहे, असंही शरद पवार म्हणाले.

काय आहे राज्य सहकारी बँकेचा घोटाळ्याचा आरोप?

- 2005 ते 2010 या कालावधीत राज्य शिखर बँकेवर वर्चस्व असणाऱ्या संचालक मंडळांनी नियमबाह्य कर्जाचे वितरण केलं.

- राज्यातल्या अनेक सहकारी साखर कारखाने सूतगिरण्या यासह अनेक सहकारी संस्थांना कर्जाचं वाटप केलं गेलं.

- हे सर्व कर्ज नियमबाह्य पद्धतीने दिले गेले. साधारण त्याची रक्कम पंधराशे कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

- अजित पवारांचे निकटवर्तीय राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव पाटील राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना बहुतेक कर्ज दिलं गेलं. यावरून हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली.

- राज्य सहकारी बँकेला या सर्व प्रकरणामुळे आर्थिक नुकसान तर झालेच पण स्वतःच्या सहकारी संस्थांसाठी नियमबाह्य कर्ज देत मोठ्या प्रमाणात फायदा मिळवल्याचा आरोप या याचिकेत केला गेला आहे.

==================================================================================================

VIDEO : शरद पवार काय म्हणाले पाहा

First Published: Sep 24, 2019 09:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading