राष्ट्रवादी सोडलेल्या आमदाराच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी पवार मैदानात

राष्ट्रवादी सोडलेल्या आमदाराच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी पवार मैदानात

शरद पवारांचे निकटवर्तीय आणि बार्शीचे विद्यमान आमदार दिलीप सोपल हे राष्ट्रवादी सोडून शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहेत.

  • Share this:

सागर सुरवसे, 12 ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज बार्शीमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. बार्शीतील राष्ट्रवादीचे उमेदवार निरंजन भूमकर यांच्या प्रचारासाठी शरद पवार हे बार्शीत सभा घेत आहेत. शरद पवारांचे निकटवर्तीय आणि बार्शीचे विद्यमान आमदार दिलीप सोपल हे राष्ट्रवादी सोडून शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहेत.

बार्शीचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. त्यामुळे आजच्या सभेत शरद पवार हे सोपलांचा कसा समाचार घेणार, याकडे बार्शीकरांचे लक्ष लागलं आहे.

कोण आहेत दिलीप सोपल?

-दिलीप सोपल 1990 पासून पाच वेळा काँग्रेस, राष्ट्रवादीच्या तिकीटावर आमदार झाले

- शिवसेनेकडूनही निवडणूक लढवली

Loading...

- आता विधानसभेच्या तोंडावर त्यांनी शिवसेनेचं शिवबंधन हाती बांधलं

- हजरजबाबी भाषणांसाठी मतदारसंघात लोकप्रिय

दिलीप सोपल यांच्या शिवसेना प्रवेशानंतर सोलापूर जिल्ह्यात एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी तेव्हा शिवसेना सोडून राष्ट्रवादीत गेलेल्या दिलीप सोपल यांच्यावर जहरी टीका केली होती. या भाषणात बाळासाहेब ठाकरे यांनी सोपलांचा 'माकड' असा उल्लेख केला होता. तसंच 'गद्दारांना गाडा' असं म्हणत सोपलांचा पराभव करण्याचं आवाहन केलं होतं. आता दिलीप सोपल यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा हाती घेतल्यानंतर बाळासाहेबांचा जुना व्हिडिओ व्हायरल झाला.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे दिग्गज नेते प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील राज्यभर फिरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या नेतृत्वाकडून शरद पवार यांना लक्ष्य केलं जात आहे. त्यामुळे आजच्या सभेत शरद पवार त्याबद्दलही भाष्य करण्याची शक्यता आहे.

...म्हणून विखेंनी काँग्रेस सोडली, बाळासाहेब थोरातांची UNCUT मुलाखत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 12, 2019 12:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...