मुंबई, 25 जानेवारी : भीमा कोरेगाव हिंसाचाराशी संबंधित तपास राष्ट्रीय अन्वेषण एजन्सी(National Investigation Agency )कडे सोपवण्यात आला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेत केंद्र सरकारवर टीका केली आहे. 'सत्य बाहेर येण्याच्या भितीमुळे केंद्र सरकारने या प्रकरणात NIA कडे तपास दिला आहे,' असा घणाघाती आरोप शरद पवार यांनी केला आहे.
'कायदा व सुवव्यवस्था हे राज्य सरकारचं काम आहे. भीमा कोरेगाव प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यांनी तारतम्य ठेवलं नाही. एल्गार परिषदेत चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आली. अन्यायाबद्दल बोलणं म्हणजे नक्षलवाद नव्हे. आम्ही एसआयटीची मागणी केल्यानंतर केंद्र सरकारने कुरघोडी केली आहे. सत्य बाहेर या भितीनं एनआयएकडे तपास,' असं पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले.
दरम्यान, या प्रकरणातील तपासाबाबत महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पोलिसांशी आढावा बैठक घेतली होती. मात्र आता या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविल्यानंतर महाविकास आघाडी सरकार आणि केंद्र यांच्यातील वाद वाढण्याची शक्यता आहे. हा तपास एनआयएकडे सोपविल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी असा आरोप केला आहे की, केंद्र सरकारने त्यांच्याशी यापूर्वी कोणतीही चर्चा केली नव्हती. यापूर्वी आढावा बैठकीची काही प्रकरणे मागे घेण्यात आली होती आणि एसआयटीमार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती.
मनसेनं हिंदुत्त्वाचा मुद्दा हाती घेतला असतानाच संजय राऊत यांची मोठी घोषणा
अनिल देशमुख पुढे म्हणाले की, भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास महाराष्ट्र सरकारच्या सहमतिशिवाय एनआयएकडे देण्यात आला. कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवणं संविधानाच्या विरोधात आहे. मी याचा निषेध करतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.