मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शरद पवारांनी केली राज्यपालांबद्दल मोठी मागणी, म्हणाले...

शरद पवारांनी केली राज्यपालांबद्दल मोठी मागणी, म्हणाले...

Sharad Pawar

Sharad Pawar

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील याच मुद्द्यावरून राज्यपालांवर निशाणा साधला आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ajay Deshpande

मुंबई :  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील याच मुद्द्यावरून राज्यपालांवर निशाणा साधला आहे. 'राज्यपालांच वैशिष्ट्य म्हणजे अनेक गोष्टींवर वादग्रस्त विधान करण्याचा त्यांचा लौकिक आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल त्यांनी जे वक्तव्य केलं ते निषेधार्थ आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

शरद पवार यांनी नेमकं काय म्हटलं? 

'राज्यपालांच वैशिष्ट्य म्हणजे अनेक गोष्टींवर वादग्रस्त विधान करण्याचा त्यांचा लौकिक आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल त्यांनी जे वक्तव्य केलं ते निषेधार्थ आहे. संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीला अशा प्रकारचे भाष्य करणे शोभत नाही.  कार्यक्रम संपला होता. त्यामुळे आम्हाला ते काय बोलले कळले नाही. राज्यपाल शेवटी बोलले. राज्यपाल एक जबाबदार व्यक्ती आहेत. त्यांचा वादग्रस्त विधान करण्याचा लौकिक आहे. या पदावर बसलेल्या व्यक्तीने जबाबदारीने भूमिका घ्यायची असते, हे स्मरण नसलेली व्यक्ती महाराष्ट्रात पाठवली आहे. राज्यपाल बोलले तेव्हा मी होतो. माझ्याबाबत उल्लेख नव्हता, ते गडकरींबाबत बोलले' असं पवार यांनी म्हटलं आहे.

राज्यपालांनी मर्यादा सोडली 

पुढं बोलताना त्यांनी म्हटलं की,  'राज्यपाल संवैधानिक पद आहे, त्यावर अधिक बोलणार नाही. छत्रपतींबाबत बोलताना राज्यपालांनी सर्व मर्यादा सोडली आहे. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची नंतर स्तुती केली होती. हे उशिराने सुचलेलं शहाणपण आहे. याचा निर्णय राष्ट्रपती, पंतप्रधान यांनी घेतला पाहिजे अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.

First published:

Tags: BJP, Sharad Pawar