'हवाई हल्ल्यां'बाबत मी तसे बोललोच नाही, शरद पवारांचा खुलासा

'हवाई हल्ल्यां'बाबत मी तसे बोललोच नाही, शरद पवारांचा खुलासा

'सरकार जो निर्णय घेईल त्याला माझा पाठिंबा असेल असं मी आणि सर्वच नेत्यांनी म्हटलं होतं.'

  • Share this:

मुंबई 18 मार्च : पुलमावा हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त करण्याचा सल्ला शरद पवारांनी दिला होता अशा आशयाच्या बातम्या आल्यानंतर शरद पवारांनी आता त्यावर खुलासा केलाय. मी प्रचार सभेतल्या भाषणात जे बोललो त्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा खुलासा शरद पवारांनी फेसबुकवर केला आहे.

सरकार जो निर्णय घेईल त्याला माझा पाठिंबा असेल असं मी आणि सर्वच नेत्यांनी म्हटलं होतं. सैन्य दलाचा सगळ्यांनाच अभिमान आहे. मात्र त्याचं राजकारण होऊ नये असंही पवारांनी आपल्या खुलाशात म्हटलं आहे.

काय केला शरद पवारांनी खुलासा?

''पुलवामा घटनेनंतर केंद्र सरकारने दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. या बैठकीत भारतीय सैन्यदलाच्या पाठीशी राहण्याचा ठराव एकमताने संमत झाला. त्यात माझाही सहभाग होता. काल मावळ लोकसभा मतदार संघातील उमेदवाराच्या प्रचारसभेत पाकव्याप्त काश्मिरमधील बालाकोट आणि इतर ठिकाणचे अतिरेक्यांचे अड्डे हवाई बॉम्ब हल्ल्याने नष्ट करावेत असा सल्ला मी दिल्याचा प्रसारमाध्यमांनी उल्लेख केला.

परंतु तो माझ्या वक्तव्याचा विपर्यास आहे. मी सदर बैठकीत सल्ला दिला नसून केंद्र सरकारच्या या संदर्भातील धोरणास माझ्यासह सर्व राजकीय पक्ष प्रमुखांची संमती होती.

भारतीय सैन्याचा आपणा सर्वांना अभिमान आहे. भारतीय लष्कराचे सामर्थ्य जगाला ठाऊक आहे. १९६५ आणि १९७१ च्या भारत-पाक युद्धात व नंतर कारगिल युद्धात त्याची प्रचिती आली आहे. त्यामुळे पुलवामा घटनेनंतर भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मिर मधील अतिरेक्यांच्या तळांवर  केलेल्या हवाई हल्ल्यात किती अतिरेकी ठार झाले याची चर्चा व्हायला नको. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संरक्षणविषयक कारवाईचे राजकारण होऊ नये, असे माझे मत आहे.

VIDEO: बापरे ! गुजरातमध्ये एकाच वेळेस दिसले तब्बल 10 सिंह

First published: March 18, 2019, 4:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading