शरद पवारांची नवी खेळी : साताऱ्यातून उदयनराजेंना शह देण्यासाठी स्वतः उतरणार रिंगणात?

शरद पवारांची नवी खेळी : साताऱ्यातून उदयनराजेंना शह देण्यासाठी स्वतः उतरणार रिंगणात?

विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर साताऱ्यात मात्र जास्त चर्चा आहे लोकसभेच्या पोटनिवडणुकीची. 'सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत शरद पवार यांनी अर्ज दाखल केला तर मी ही निवडणूक लढवणार नाही', असं भाजपत प्रवेश केलेल्या उदयनराजेंनी म्हटलं होतं.

  • Share this:

मुंबई, 25 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर साताऱ्यात मात्र जास्त चर्चा आहे लोकसभेच्या पोटनिवडणुकीची. कारण उदयनराजेंनी राजीनामा दिल्यानंतर आता तिथल्या रिक्त जागेसाठी मतदान होईल. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन सत्तारुढ भाजपत प्रवेश केल्याने उदयनराजे भोसले यांना आता खासदार होण्यासाठी निवडून यावंच लागेल. भाजपकडून निवडणूक लढवताना त्यांना कोणाचा सामना करावा लागेल हे अद्याप ठरलेलं नाही. पण एका वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार, शरद पवार स्वतः पोटनिवडणुकीला उभे राहू शकतात.राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवारांनीच ही पोटनिवडणूक लढवावी यासाठी आग्रही आहेत. कदाचित स्वतः पवार उदयनराजेंना शह देण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतील, अशी चर्चा आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसोबतच ही पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे या जागेसाठीही 21 ऑक्टोबरला मतदान होईल आणि 24 ऑक्टोबरला मतमोजणी होईल.

भाजपमध्ये प्रवेश केलेल्या उदयनराजे भोसले यांना आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजेंना टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादीकडून अनेक नाव चर्चेत येत आहेत. उदयनराजेंची भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाल्यापासूनच त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी राष्ट्रवादीच्या गोटातून माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचं नाव आघाडीवर होतं. नंतर श्रीनिवास पाटील यांचे पुत्र सारंग पाटील यांचंही नाव स्पर्धेत आलं.

पाहा VIDEO : शरद पवार Uncut प्रेस कॉन्फरन्स

सारंग पाटील पोटनिवडणुकीत उदयनराजेंना टक्कर देऊ शकतील, असा मतप्रवाह राष्ट्रवादीत तयार होताना दिसत असतानाच आता पवारांनीच निवडणूक लढवावी यासाठी कार्यकर्ते आग्रह करत आहेत. परंतु पक्षाकडून अद्याप कोणत्याही नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

वाचा - शिखर बॅंक घोटाळ्याशी पवार साहेबांचा काय संबंध? एकनाथ खडसेंनी केली पाठराखण

Loading...

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकताच सातारा दौरा केला. त्यानंतर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेले उदयनराजे भोसले हे शरद पवार यांच्याबद्दल बोलताना भावुक झाले होते. तसंच यावेळी उदयनराजे यांना अश्रू अनावर झाले आहेत.

'सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत शरद पवार यांनी अर्ज दाखल केला तर मी ही निवडणूक लढवणार नाही. मला शरद पवार यांच्याबद्दल खूप आदर आजही आहे,' असे भावुक उद्गार यावेळी उदयनराजेंनी काढले. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे.

वाचा - शिवरायांचे संस्कार...आम्ही दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही!

साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर साताऱ्यासह इतर भागातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. 'सर्वांचा विरोध असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंना तिकीट दिलं. जनतेनंही उदयनराजेंच्या बाजूने कौल दिला. मग त्यांनी आता अवघ्या तीन महिन्यात पक्ष का सोडला,' असा प्रश्न राष्ट्रवादीकडून विचारला जात आहे.

उदयनराजेंच्या भाजप प्रवेशानंतर शरद पवार यांनी रविवारी पहिल्यांदाच साताऱ्यात दाखल होत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात शरद पवारांचं स्वागत केलं. शरद पवारांच्या स्वागताला साताऱ्यात झालेल्या गर्दीनंतर उदयनराजेंसमोर मोठं राजकीय आव्हान उभं राहिलं आहे, अशी चर्चा आहे.

------------------------------------------------------------------------

VIDEO : आजोबांसाठी नातूही मैदानात, भाजपवर जोरदार हल्लाबोल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 25, 2019 06:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...