'निर्धास्त राहा, प्रत्येक आमदाराची जबाबदारी माझी' : 80 वर्षांच्या पवारांनी दिला शब्द

'निर्धास्त राहा, प्रत्येक आमदाराची जबाबदारी माझी' : 80 वर्षांच्या पवारांनी दिला शब्द

मुंबईतल्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये हा शक्तिप्रदर्शनाचा ऐतिहासिक 'सोहळा' रंगला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याकडच्या आमदारांच्या पाठिंब्याचं जोरदार शक्तिप्रदर्शन आज जाहीर केलं.

  • Share this:

मुंबई, 25 नोव्हेंबर : We are 162 आम्ही १६२ असे लिहिलेले फलक आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे आमदार एकत्रितरीत्या एकत्र राहण्याची घेतलेली शपथ... मुंबईतल्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये हा शक्तिप्रदर्शनाचा ऐतिहासिक 'सोहळा' रंगला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याकडच्या आमदारांच्या पाठिंब्याचं जोरदार शक्तिप्रदर्शन आज जाहीर केलं. महाराष्ट्रातल्या राजकारणात वेगवेगळ्या बसने एकत्र येत हॉटेलमध्येच बहुमत दाखवण्याचा प्रकार पहिल्यांदाच झाला असावा. या कार्यक्रमात तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी नवनिर्वाचित आमदारांना दिलासा द्यायचा प्रयत्न केला.

संभाव्य पर्यायी सरकारचे शिल्पकार ठरू पाहणारे शरद पवार यांनी या कार्यक्रमातही बाजी मारली. 80 वर्षांचे पवार बोलायला उभे राहिले तेव्हा आपल्या पुतण्यानेच बंड केलं आणि कुटुंबातच तट पडले हे विसरून त्यांनी आमदारांना भक्कम दिलासा दिला. "मी शब्द देतो, तुम्हाला काही होणार नाही", अशा शब्दांत त्यांनी आमदारांची जबाबदारी घेतली.

वाचा - महाविकासआघाडीचं हॉटेलमध्ये शक्तिप्रदर्शन : आता भाजपसाठी उरल्या आहेत या 4 शक्यता

शरद पवार म्हणाले, "तुम्ही निर्धास्त राहा, भीती बाळगू नका. तुम्हाला काहीही होणार नाही. नव्या सदस्यांच्या मनात मुद्दाम संभ्रम निर्माण केला जातो आहे.  सदस्यत्व जाण्याची भीती बाळगू नका. तसं काही होणार नाही."

वाचा - फोटो तुमचा, फोटोग्राफर तुमचा पण..., महाविकासआघाडीच्या फ्लोअर टेस्टवर भाजपची टीका

पवार असंही म्हणाले, "प्रत्येक आमदाराची जबाबदारी मी घेण्यास तयार आहे. तुम्हाला काही होणार नाही, याची खात्री बाळगा."

धडा कसा शिकवायचा हे आता वेगळं सांगायला नको, कारण आता शिवसेना आपल्या सोबत आहे, असाही टोला त्यांनी जाता जाता हाणला.

उद्या जर कोर्टाने आपल्याला विश्वासदर्शक ठराव सादर करण्यास सांगितले तर सहज करू, आपल्याकडे 162 आमदाराचं नाहीतर आणखी आमदार संपर्कात आहे. आज 162 आमदार समोर आहे, अजून काही आमदार दाखवायचे असेल तर तेही दाखवू, असा दावाही शरद पवार यांनी केला आहे.

संबंधित - आमच्याकडे 162 पेक्षा जास्त आमदार, शरद पवारांचा भाजपला दे दणका

अजित पवार हे पक्षाचे आता गटनेते नाही. त्यांना कोणताही व्हीप काढण्याचा अधिकार नाही. त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही, तुमची वैयक्तिक जबाबदारी ही माझी आहे, असा विश्वासही पवारांनी सर्व आमदारांना दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 25, 2019 08:56 PM IST

ताज्या बातम्या