राष्ट्रवादीला मोठा धक्का, विधानसभेचं तिकीट दिलेल्या महिला उमेदवार करणार भाजपमध्ये प्रवेश

राष्ट्रवादीला मोठा धक्का, विधानसभेचं तिकीट दिलेल्या महिला उमेदवार करणार भाजपमध्ये प्रवेश

केज मतदारसंघातून भाजप उमेदवारी देणार असल्याचं फायनल झालं असल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

  • Share this:

बीड, 30 सप्टेंबर : राष्ट्रवादीची पहिली यादी आज जाहीर होणार अशी चर्चा असताना राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत शरद पवारांनी घोषित केल्या केजच्या उमेदवार नमिता मुंदडा या आज परळीमध्ये  भाजप प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. राष्ट्रवादीसाठी हा सगळ्यात मोठा धक्का मानला जात आहे. ज्या नेत्याला उमेदवारी दिली तोच आता पक्ष सोडणार असल्याने राष्ट्रवादीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

परळीत थोड्याच वेळात नमिता मुंदडा या भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. तर त्यांना केज मतदारसंघातून भाजप उमेदवारी देणार असल्याचं फायनल झालं असल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे. नमिता यांच्या भाजप प्रवेशानंतर आता ऐनवेळी राष्ट्रवादी कोणता उमेदवार रिंगणात उभा करणार याकडे  सगळ्यांचं लक्ष आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत पवार विरुद्ध फडणवीस असा सामना रंगताना पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेत ईडीचं संकट परतावून लावल्याने राष्ट्रवादीच्या गोटात उत्साह संचारला. पण त्यानंतर बारामतीत अजित पवार यांची कोंडी करण्यासाठी भाजपने आता नवा डाव टाकला आहे.

वंचित बहुजन आघाडीतून राजीनामा दिलेले धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर भाजपकडून अजित पवार यांच्याविरोधात बारामतीतून लढण्याची शक्यता आहे. गोपीचंद पडळकर आज दुपारी 12 वाजता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार असल्याचं निश्चित झालं आहे.

पवारांविरोधात भाजप वापरणार 2014 चा 'लोकसभा पॅटर्न'

भाजपकडून थेट काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला जात आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघात रासपचे नेते महादेव जानकर यांना मैदानात उतरवून राज्यभर वातावरण निर्मिती केली होती. धनगर समाजाचे नेते असलेले जानकर तेव्हा विजयापासून दूर राहिले असले तरी त्यांनी सुप्रिया सुळे यांना कडवी झुंज दिली होती.

इतर बातम्या - BREAKING: जलसंधारण मंत्र्यांच्या गाडीने तरुणाला चिरडलं, जागीच मृत्यू

यंदाच्या निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी भाजपने गोपीचंद पडळकर यांची निवड केली आहे. गोपीचंद पडळकर हेदेखील धनगर समाजाचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच भाजप त्यांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे. पवारांना आव्हान देण्यासाठी भाजपकडून धनगर समाजातील नेत्यांना समोर आणण्याचं महत्त्वाचं कारण आहे ते या परिसरातील जातीय समीकरण. बारामती मतदारसंघात मराठा समाजापाठोपाठ धनगर समाजाची मतं आहेत. त्यामुळे धनगर समाजातील मतदारांना चुचकारण्यासाठी भाजपने ही खेळी खेळल्याची चर्चा आहे.

भाजप देणार विद्यमान आमदारांना धक्का, या मतदारसंघातून तिकीट कापण्याची शक्यता!

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक राजधानी दिल्लीतील भाजप मुख्यालयात झाली. जवळपास साडेचार तास चाललेल्या बैठकीमध्ये विधानसभा उमेदवारांच्या नावावरती अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. पण अशात भाजप आता विद्यामान आमदारांचं तिकीट कापणार की काय अशी चर्चा आहे. विदर्भात आणि नागपूरमध्ये विद्यमान आमदारांना भाजपकडून डच्चू देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्यात बैठक पार पडल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.

इतर बातम्या - काँग्रेस सोडणाऱ्या आमदाराला धक्का, पक्षांतर करूनही तिकीट मिळणार नाही?

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अनेक दिग्गज मंत्र्यांची मेगाभरती झाली. त्यामुळे भाजप आता नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याची माहिती आहे. त्यात ज्या विद्यमान आमदारांनी गेली 5 वर्ष पक्षासाठी कामं केली नाही अशा आमदारांचं भाजप तिकीट कापरणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे भाजपच्या आज जाहीर होणाऱ्या पहिल्या यादीमध्ये कोणत्या उमेदवारांना संधी मिळणार आणि कोणाचं तिकीट कापलं जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

इतर बातम्या - या मतदारसंघात युती तुटणार, शिवसेनेचा भाजप विरोधात एल्गार

दरम्यान, नागपूर दक्षिण, नागपूर पश्चिम आणि उत्तर नागपूरसह विदर्भातही काही आमदारांना डच्चू देण्यात येणार असल्याची चर्चा मीडियामध्ये आहे. काँग्रेसने रविवारी 51 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामुळे आता कोणत्या उमेदवारांना रिंगणात उतरवणार याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपने 90 टक्के उमेदवारांची नावं निश्चित केली असल्याची माहिती आहे. तर युतीमुळे काही जागांचा निर्णय अद्याप व्हायचा आहे. दरम्यान, ज्या उमेदवारांनी गेल्या 5 वर्षात पक्षासाठी कामं केली नाही अशा 20 टक्के नेत्यांना भाजपकडून नारळ देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 30, 2019 11:04 AM IST

ताज्या बातम्या