मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

ST संपावर तोडगा काढण्यासाठी शरद पवारांचा पुढाकार, अडीच तासांपासून अनिल परब आणि अजित पवारांसोबत गुप्त बैठक

ST संपावर तोडगा काढण्यासाठी शरद पवारांचा पुढाकार, अडीच तासांपासून अनिल परब आणि अजित पवारांसोबत गुप्त बैठक

ST कर्मचाऱ्यांच्या संपावर सन्मानजनक तोडगा काढण्यासाठी मुंबईच्या नेहरू सेंटर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यालयात बैठक सुरु झाली आहे.

मुंबई, 22 नोव्हेंबर: गेले तीन आठवडे चिघळत चाललेला ST कर्मचाऱ्यांच्या संपावर सन्मानजनक तोडगा काढण्यासाठी मुंबईच्या नेहरू सेंटर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यालयात बैठक सुरु झाली आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थ मंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक सुरू आहे.

गेले अडीच तास ही बैठक सुरू आहे. ST कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या मागणीवर काय तोडगा निघू शकतो यावर ही महत्वाची चर्चा होतेय. ST कर्मचाऱ्यांच्याा विलिनीकरणाच्या मागणीवर महत्वाची अडचण आहे ती आर्थिक तरदुतींची ती कशी भरून काढणार यावरच या बैठकीत महत्वाची चर्चा सुरू आहे. ST कर्मचाऱ्यांचा संप अधिक चिघळून त्याला वेगळं वळन लागू नये यासाठी आज महत्वाचा निर्णय होऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा- रिचार्ज संपला तरी आता नो टेन्शन! आता Jio देत आहे काही सेकंदात Data Loan

आज मुंबई हायकोर्टात सुनावणी

एसटी कर्मचाऱ्यांविरोधातील अवमान याचिकेवर आज मुंबई हायकोर्टमध्ये सुनावणी होणार आहे. कोर्टानं संप करण्यास बंदीचे आदेश दिले आहेत. तर राज्य सरकारनेही कोर्टाच्या आदेशानुसार समिती स्थापना केली आहे. तरीही एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.

यामुळे कोर्टाच्या आदेशानुसार एसटी महामंडळाने कर्मचारी संघटनेविरोधी अवमान याचिका दाखल केली आहे. यावर कोर्टानं कर्मचारी संघटनेला कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले होते.

हेही वाचा- BAN vs PAK: सानिया मिर्झाच्या मुलाची तब्येत बिघडली, शोएब मलिक बांगलादेशहून तातडीनं दुबईला रवाना 

यावर आपण सर्व कर्मचाऱ्यांच्यावतीने कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केल्याचा दावा कर्मचारी संघटनेचे वकील डॉ. गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. न्यायमूर्ती वराळे न्यायमूर्ती मोडक यांच्या खंडपीठासमोर समोर कोर्टात सुनावणी होणार आहे. ॲड कोठारे आणि ॲड पिंकी बनसाली सरकारची बाजू मांडतील.

याप्रकरणी आज कोर्टात काय सुनावणी होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. एसटी कर्मचारी महामंडळचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी दिवाळीपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत.

First published:

Tags: Ajit pawar, Anil parab, शरद पवार