मुंबई, 14 नोव्हेंबर : महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी गेल्या अनेक दिवसांपासून खलबतं सुरू आहेत. भाजपपासून दूर गेलेल्या शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जवळीक साधली आहे. पण या संभाव्य आघाडीतही सत्तावाटपाचा फॉर्म्युला ठरू शकलेला नाही. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी या दोन नेत्यांमध्ये दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.
सत्तास्थापनेसाठी संभाव्य महाशिवआघाडीच्या वाटाघाटीवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यातील भेट होणार असल्याची माहिती आहे. पुढील दोन ते तीन दिवसात होत असलेल्या या बैठकीत समान कृती कार्यक्रम आणि पद व जबाबदारीचे वाटप याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्तास्थापनेच्या दृष्टीने महाराष्ट्रासाठी पुढील तीन दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत.
दरम्यान, शिवसेना(Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) यांच्या महाशिवआघाडी संदर्भात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik)यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. राज्यात महाशिवआघाडीसे सरकार आल्यास त्या सरकारमध्ये शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपद गेल्यास राष्ट्रवादी आणि काँग्रेसला कसलीच अडचण नसल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले.
राज्यात सरकार स्थापनेसंदर्भात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या दोन दिवसांपासून चर्चा सुरु आहेत. याच दरम्यान राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. शिवसेनेने भाजपने शब्द न पाळल्याचे सांगत महाआघाडीसोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला. आता या तिन्ही पक्षामध्ये सत्तेचा फॉर्म्युला कसा असेल यावर चर्चा सुरु आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी प्रथम राष्ट्रवादी सोबत चर्चा केल्यानंतर काल त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी देखील चर्चा केली होती. तिन्ही पक्ष एकत्र येऊन किमान समान कार्यक्रम निश्चित करतील आणि सत्तेचा वाटा कसा असेल हे देखील निश्चित करतील असे सूत्रांकडून कळते.
शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी काल (बुधवार) रुग्णालयातून बाहेर येताच सेनेचाच मुख्यमंत्री होईल असे पुन्हा एकदा स्पष्ट केले होते. त्यानंतर भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका मुलाखतीत मुख्यमंत्रिपदाचे कोणतेही आश्वासन दिले नसल्याचे म्हटले होते. शहा यांच्या या विधानाचा समाचार आज (गुरुवारी) सकाळी संजय राऊत यांनी नेहमी प्रमाणे पत्रकार परिषद घेऊन केला.
दोन हॉटेल मालकांमध्ये तुफान हाणामारी, पाहा VIDEO
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा