मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत शरद पवारांनी केल्या 'या' 10 मागण्या

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत शरद पवारांनी केल्या 'या' 10 मागण्या

शरद पवार यांनी आपल्या दुष्काळ दौऱ्यानंतर लोकांकडून आलेल्या मगाण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या.

  • Share this:

मुंबई, 16 मे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि इतर नेत्यांची (बुधवारी) बैठक झाली. या बैठकीत दुष्काळाबाबतच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. शरद पवार यांनी आपल्या दुष्काळ दौऱ्यानंतर लोकांकडून आलेल्या मगाण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या.

या बैठकीत फळबाग, चारा छावण्या, दुष्काळी भागातील नागरिकांच्या हाताला काम, योग्य पाणी नियोजन, दुष्काळ भागात अन्नधान्य नियोजन, जायकवाडी धरण पाणी या प्रमुख विषयांवर चर्चा करण्यात आली.

शरद पवारांनी काय मागण्या केल्या?

दुष्काळग्रस्त भागात जनावरांसाठी चारा छावण्या उशिरा दिल्या गेल्या. चारा अनुदान केवळ 90 रुपये दिले जाते ते 110 करावे.

केवळ ऊस चारा म्हणून न देता इतर चारा द्यावा

फळबागा जळून चालल्या आहेत. फळबाग जळणे म्हणजे 25 वर्षांचं नुकसान आहे.

आमच्या सरकारच्या काळात आम्ही प्रति-हेक्टर 35 हजार दिले होते ते द्यावेत.

2011 च्या जनगणनेनुसार पाणी दिले जाते त्यात बदल करावा.

दुष्काळग्रस्त भागात पाणी वाटपात घोटाळा होतो ते रोखावे.

छावण्या सुरू झाल्या पण ज्या संस्था छावण्या चालवतात त्यांना पैसे दिले गेले नाही.

एका दिवसाचा संस्थांचा खर्च 1 लाख आहे महिनाभर छावण्या कशा चालवणार?

विम्याचे पैसे मिळाले नाहीत. फळबाग योजना विमा का मिळाली नाही?

जायकवाडी धरणाचे पाणी मराठवाड्याला सध्या देण्यात यावे. नाहीतर बाष्पीभवन होऊन ते पाणी वाया जाईल.

दरम्यान मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या या बैठकीला शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, प्रफुल्ल पटेल, राणा जगजीतसिंह पाटील, दीपक साळुंखे उपस्थित होते.

SPECIAL REPORT : दुष्काळ नही हैं 'सदा' के लिये?

First published: May 16, 2019, 7:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading