Home /News /maharashtra /

ST Strike: एसटी संपाबाबतच्या बैठकीत घेतले गेले हे महत्त्वाचे निर्णय, कामगारांना कामावर परत येण्याचं आवाहन

ST Strike: एसटी संपाबाबतच्या बैठकीत घेतले गेले हे महत्त्वाचे निर्णय, कामगारांना कामावर परत येण्याचं आवाहन

बैठकीत झालेल्या चर्चेनंतर एसटी कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच विलनिकरणासाठी 12 आठवड्यांची मूदत दिलेली आहे

मुंबई 10 जानेवारी : राज्यात गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप (Bus Strike) सुरू आहे. काही कर्मचारी कामावर परतले असले तरी अजूनही काही एसटी कर्मचारी संपातून माघार घ्यायला तयार नाहीत. अशात आज या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत एसटीच्या कृती समितीची बैठक झाली आहे. या बैठकीला परीवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) हेदेखील उपस्थित होते. शरद पवार यांच्या उपस्थितीत 22 वेगवेगळ्या एसटी कर्मचारी संघटनांशी प्रदिर्घ चर्चा झाली. Police Recruitment: नागपूर पोलीस भरती घोटाळ्यात औरंगाबाद कनेक्शन उघड बैठकीत झालेल्या चर्चेनंतर जे एसटी कर्मचारी कामावर येतील त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच विलनिकरणासाठी 12 आठवड्यांची मूदत दिलेली आहे. संपात काही लोक निलंबित झाले होते, त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता त्यांना सेवेत घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. बैठकीत सर्व प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली आहे. या बैठकीला सर्व श्रमिक संघटना उपस्थित होत्या. बैठकीत सातवा वेत आयोग तसंच कारवाई मागे घेण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली आहे, त्यामुळे सर्व कामगारांनी कामावर यावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. या बैठकीनंतर एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर येण्याचं आवाहन केलं गेलं आहे. विलणिकरणाचा मुद्दा न्यायप्रविष्ठ असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब, एसटीच्या मान्यताप्त संघटनेसह, एसटीचे अधिकारी उपस्थित होते.

गोव्यात मविआ एकत्र का लढणार नाही? राऊतांनी सांगितलं काँग्रेसच्या नकाराचं कारण

याबाबत बोलताना अजय कुमार गूजर म्हणाले, की 'आम्ही पुकारलेला संप 20 डिसेंबर रोजी मागे घेतलेला होता. पण काही अडचणी होत्या त्या आता सोडवलेल्या आहेत. सातव्या वेतन आयोगाप्रमाणे कसं वेतन देता येईल या संदर्भात चर्चा झाली आहे. आज आम्ही नवीन वकिलांची नेमणुक केलेली आहे. न्यायालय जो निर्णय देईल तो दोन्ही बाजूच्या लोकांना मान्य असेल. सर्व कर्माचार्यांनी ताबडतोब सेवेत दाखल व्हा' या विषयावर बोलताना शरद पवार म्हणाले, की कोरोनाचा नवा अवतार आपण गेले काही दिवस पाहात आहोत. कृती समितीच्या सदस्यांनी त्यांच्या मागण्या सांगितल्यात. ST चालू झाली पाहिजे. त्यामुळे, कर्मचार्यांनी सेवेत परत यायला हवं. कृती समितीमधील 22 संघटनांच्या प्रतिनिधींनी कामगार आणि प्रवाशांच्या हितासाठी सकारात्मक निर्णय घेतला आहे. कामगार संभ्रमात होते म्हणून हा 2 महिन्यांचा वेळ लागला, असंही पवार म्हणाले. पुढे ते म्हणाले की विलनिकरणाची शक्यता नाही हे राज्य सरकारने सांगितलं आहे, पण त्यात सुधारणा आहे का? हा प्रश्न आता न्यायालयात आहे. तिथे काय निर्णय होतोय तो सर्वांना बांधिल राहील. एखाद्या राजकीय पक्षाने काहीही भूमिका घेतली तर आम्ही मात्र जनतेच्या प्रश्नांशी बांधिल राहीलं पाहिजे, असंही ते म्हणाले.
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Sharad pawar, St bus, Strike

पुढील बातम्या