मुंबई, 4 जानेवारी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नाही तर स्वराज्य रक्षक होते, असं विधान केलं. अजित पवारांच्या या विधानावरून राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं. भाजपने अजित पवारांविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केलं, तसंच त्यांनी माफी मागावी आणि राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
अजित पवारांनी केलेल्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली. छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणायचं असेल तर धर्मवीर म्हणा. ज्यांना त्यांनी स्वराज्याचं रक्षण केलं असं वाटत असेल त्यांनी स्वराज्य रक्षक म्हणा, असं शरद पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार आणि शरद पवार यांच्या या विधानांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
त्यांच्या पक्षात अजित पवार आणि शरद पवार गट आहेत, म्हणून ते बोलत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. धर्मवीर पदी संभाजी राजे यांना वर्षानुवर्ष आहे. अजित पवारांनी माफी मागावी, त्यांना पण तोच नियम लागू होईल, अशी मागणीही एकनाथ शिंदे यांनी केली.
औरंगजेबाचं उदात्तीकरण सुरू आहे, शिवप्रेमी जनता नक्की उत्तर देईल, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या औरंगजेबाबद्दलच्या वक्तव्याचाही समाचार घेतला.
छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षकच म्हणणार, अजित पवारांनी ठामपणे ठणकावलं
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, NCP, Sharad Pawar