परप्रांतीयांना राज्यात परत आणण्यासाठी धोरण आखण्याचा शरद पवारांचा सल्ला

परप्रांतीयांना राज्यात परत आणण्यासाठी धोरण आखण्याचा शरद पवारांचा सल्ला

लॉकडाऊनमध्ये मोठ्या संख्येने मजूर त्यांच्या गावी परतले आहे. राज्यातील कंपन्या पुन्हा सुरू करण्यासाठी मजुरांना पुन्हा आणण्याची गरज आहे

  • Share this:

मुंबई, 22 मे : देशभरात कोरोनाचा (Coronavirus) कहर वाढत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून देशात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे मोठ्या संख्येने मजूर, कामगार आपआपल्या गावी परतले आहेत. मात्र यामुळे राज्यात विविध कंपन्यांना कामे करणे अवघड जात आहे.

याबाबत केंद्रीय मंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी लॉकडाऊननंतर आर्थिक संकट सोडविण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना करण्याचे आवश्यक असल्याचे सांगितलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

त्यामध्ये ते म्हणतात, राज्य सरकार लॉकडाऊनची परिस्थिती शिथिल करीत आहेत. पण मजूर, कामगार खेड्यांमध्ये स्थलांतरित झाल्याने कारखाने पुन्हा सुरू करण्याच्या स्थितीत नाहीत आहेत. आपणाला त्यांना परत आणण्यासाठी धोरण राबवणे आवश्यक आहे.

The state governments are relaxing the conditions of lockdown but factories are not in a position to resume as workers have migrated to the villages. We need to strategize to bring them back.

— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 22, 2020

<script>

New policies for encouraging industrial growth should be incorporated to attract new investment in the states. To increase imports, exports and inland shipping, consultations should be held with industrialists, entrepreneurs and expert officials in the field.

— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 22, 2020

<script>

दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, राज्यांमध्ये नवीन गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी औद्योगिक विकासाला प्रोत्साहित करण्यासाठी नवीन धोरणांचा समावेश केला पाहिजे. आयात, निर्यात आणि अंतर्देशीय शिपिंग वाढविण्यासाठी उद्योगपती, उद्योजक आणि क्षेत्रातील तज्ज्ञ अधिकाऱ्यांशी सल्ला मसलत करण्याची गरज आहे.

हे वाचा -आर्थिक संकटाने घेतला बळी; मुंबईहून सायकलवर घरी परतलेल्या मजुराची आत्महत्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 22, 2020 07:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading