Home /News /maharashtra /

संचारबंदीचं उल्लंघन, शरद पवार यांच्या निकटवर्तीय नेत्यासह 30 जणांवर गुन्हा

संचारबंदीचं उल्लंघन, शरद पवार यांच्या निकटवर्तीय नेत्यासह 30 जणांवर गुन्हा

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार आजी-माजी लोकप्रतिनिधींवर गुन्हा दाखल करण्याची ही सोलापूर जिल्ह्यातील दुसरी घटना आहे.

पंढरपूर, 10 एप्रिल: कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आदेश देण्यात आले. जमावबंदी, संचारबंदी लागू करण्यात आली आहे, असं असताना पाण्याच्या मागणीसाठी विविध ठिकाणी शेतकऱ्यांच्या बैठका घेतल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटलांसह 30 जणांवर सांगोला पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. माजी आमदार दीपक पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार आजी-माजी लोकप्रतिनिधींवर गुन्हा दाखल करण्याची ही सोलापूर जिल्ह्यातील दुसरी घटना आहे. हेही वाचा.. कोरोनाचा धोका वाढला, मुंबईत दिवसभरात 10 दगावले, रुग्णांनी हजाराचा टप्पा ओलांडला याबाबत मिळालेली माहिती अशी की, 8 एप्रिल रोजी टेंभूचे उन्हाळी आवर्तनाचे चाचणीसाठी सोडण्यात येणारे पाणी प्राधान्याने जवळा आणि परिसरात सोडावे, या मागणीसाठी माजी आमदार साळुखे पाटलांनी सय्यद बाबा मठ, सोनंद, बुरुंगेवाडी, जवळा आदी ठिकाणी शेतकऱ्यांच्या बैठका घेतल्या होत्या तर जवळ्याचे माजी उपसरपंचांनी जमाव जमवून आलेल्या पाण्याचे पूजन केले. यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती. सोशल डिस्टंसिंग देखील पाळण्यात आलं नाही. हेही वाचा.. जनधनचे 500 रुपये आणायला गेल्या 39 महिला आणि 10 हजार दंड भरून परतल्या! जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. माजी आमदार दीपक आबा साळुखे पाटील तसेच पाणीपूजन केल्याप्रकरणी माजी उपसरपंच आप्पासाहेब देशमुख यांच्यावर पो.ना.संजय चंदनशिवे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि.188, 269, 270 राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ( ब ) , महाराष्ट्र पोलिस कायदा 1951 चे कलम 37( 3 ) 135, साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम 1897 चे कलम 2,3,4 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपादन- संदीप पारोळेकर
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: NCP

पुढील बातम्या