मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Shambhuraj Desai : ‘तुम्हाला साध मंत्रालयात येता आलं नाही’ मग गद्दार कोण? शंभूराज देसाई यांचा सवाल

Shambhuraj Desai : ‘तुम्हाला साध मंत्रालयात येता आलं नाही’ मग गद्दार कोण? शंभूराज देसाई यांचा सवाल

शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर शिंदे गटाने भाजपासोबत सत्ता स्थापन केली. त्यामुळे शिंदे गटावर गद्दार असल्याचा आरोप होत आहे. (Shambhuraj Desai)

शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर शिंदे गटाने भाजपासोबत सत्ता स्थापन केली. त्यामुळे शिंदे गटावर गद्दार असल्याचा आरोप होत आहे. (Shambhuraj Desai)

शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर शिंदे गटाने भाजपासोबत सत्ता स्थापन केली. त्यामुळे शिंदे गटावर गद्दार असल्याचा आरोप होत आहे. (Shambhuraj Desai)

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Ahmadnagar, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

अहमदनगर, 21 सप्टेंबर : शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर शिंदे गटाने भाजपासोबत सत्ता स्थापन केली. त्यामुळे शिंदे गटावर गद्दार असल्याचा आरोप होत आहे. (Shambhuraj Desai) मात्र गद्दार कोण असा प्रति प्रश्न राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी केला आहे. 

ज्यांनी वंदनीय शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या विचाराला विरोध केला त्यांच्याबरोबर सरकारमध्ये बसलं त्यांच्याबरोबर सरकार करणं याला प्रतारणा म्हणायची का याला काय शब्द वापरायचा त्यामुळे त्यांनी आता ह्याचा विचार केला पाहिजे. कुणीही शिवसेना सोडलेली नाही.

हे ही वाचा : संजय राऊतांचा पाय आणखी खोलात, बेहिशेबी मालमत्ता चित्रपट आणि मद्य कंपनीत गुंतवली

आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले आहे. महाविकास आघाडी सरकारमुळे ज्वलंत हिंदुत्वाच्या विचारापासून शिवसेना बाजूला जाती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बरोबरच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेचे नुकसान होतंय शिवसैनिकांचा नुकसान होते. शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींचा नुकसान होत असल्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचे शंभुराज देसाई म्हणाले.

त्यावेळेस कळेल किसमे कितना है दम

महाराष्ट्रात यावर्षी शिंदे गट आणि ठाकरे यांचे दोन ठिकाणी दसरे मेळावा होत आहे. यावरती बोलताना राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई म्हणाले हे जनतेतल्या मनातल्या सरकार असून आम्ही पण आता सगळेजण महाराष्ट्रात फिरत आहेत आमचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फिरत आहेत सर्वच ठिकाणी  लोकांचा त्याला मिळणारा प्रतिसाद चांगला आहे. आता दसऱ्याच्या दिवशी दोन मेळावे होत आहेत आणि त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी महाराष्ट्रातली जनता कोणाचे बरोबर आहे ते कळेल असे देसाई म्हणाले.

तुम्ही मंत्रालयात सुद्धा आला नाहीत

प्रत्येकवेळी सामनात काहीतरी छापून येत, त्यावर काय बोलणार, मुख्यमंत्री दिल्लीत जातात ते राज्याच्या विकासाचे प्रश्न घेऊन जातात. मुख्यमंत्री नीती आयोगाच्या बैठकीला गेले तेंव्हा राज्याच्या प्रलंबित निधीबाबत त्यांनी पंतप्रधानांकडे मागणी केली त्यावर पंतप्रधानांनी देखील राज्याच्या विकासासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले. तुम्ही जेंव्हा मुख्यमंत्री होतात तेंव्हा तुम्ही साधं मंत्रालयात येत नव्हता असं म्हणत मंत्री शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवारीवरून सामनातून टीका करण्यात आली होती त्यावर शंभूराज देसाई बोलत होते.

हे ही वाचा : आता ताकद दाखवणारच! शिवसेनेनं थोपाटले दंड, पोस्टर्समधून शिंदे गटाला थेट इशारा

जो हिंदुत्ववादी विचारांच्या बरोबर असणारे जे जे लोक एकत्र येतील, त्याच्यामुळे हिंदुत्ववादी विचारांच्या लोकांच्या मतांचे विभाजन होत होते ते थांबेल असं म्हणत राज ठाकरे यांची मनसे आणि भाजप एकत्र येण्याच्या चर्चेवर शंभूराज देसाई यांनी भाष्य केलंय.

First published:

Tags: Ahmednagar, Ahmednagar News, Cm eknath shinde, Uddhav Thackeray (Politician)