आभाळा एवढं दुःख भोगून शैलाताई दाभोलकर वळल्या शेतीकडे!

आभाळा एवढं दुःख भोगून शैलाताई दाभोलकर वळल्या शेतीकडे!

आपल्या सुखी जीवनाचा त्याग करून डॉ. शैलाताई नरेंद्र दाभोलकर यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील गव्हे गावात निसर्गाच्या सानिध्यात राहून बागायती शेती करण्याचा निर्णय घेतला आहे

  • Share this:

शिवाजी गोरे, प्रतिनिधी

दापोली, 22 डिसेंबर : अंधश्रद्धा निर्मुलन, समाजातील अनिष्ठ वृढी परंपरा या विरुद्ध समाजाच्या हितासाठी  आयुष्यभर आवाज उठविणारे थोर विचारवंत, समाजसेवक डॉ.  नरेंद्र दाभोलकर यांची काही अज्ञात व्यक्तीने गोळ्या झाडून पुणे येथे हत्या केली.  मृत्यूमुळे डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून समाज कार्यात उभं आयुष्य झोकून देणाऱ्या त्यांच्या पत्नी डॉ. शैलताई दाभोळकर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या पदरी दुःख व निराशा आली. त्या खचल्या आणि अचानक आजारांनी ग्रासलं. आभाळा एवढं दुःख त्यांच्या नशिबी आलं. आधी पतीच्या हत्येचं दुःख , त्यानंतर शारिरिक वेदना या मुळे त्यांना जीवन जगणे असाहाय्य होऊन बसलं. परंतु. आभाळाएवढं दुःख  भोगून मोठ्या हिंमतीने त्यांनी निसर्गाच्या सानिध्यात राहून शेती करण्याचा धाडसी  निर्णय  घेतला.

आपल्या सुखी जीवनाचा त्याग करून डॉ. शैलाताई नरेंद्र दाभोलकर यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील गव्हे गावात निसर्गाच्या सानिध्यात राहून  बागायती शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी घेऊन ठेवलेल्या शेतजमिनीला त्यांनी आपलंसं केलं आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला 5 वर्ष होऊन गेली आहेत. त्यांचे दुःख विसरण्यासाठी व शारीरिक व्याधीतून मुक्त होण्यासाठी गेली 5 वर्ष त्या दापोलीतील आंबा , काजू , चिकू ची बागायती शेती करीत आहेत.

कुटुंबातील सुख संपत्ती आणि आपला वैद्यकीय व्यवसायाचा त्याग करून सुखी जीवन जगण्यासाठी शैलाताईंनी चक्क नैसर्गिक शेती करण्याचा निर्णय घेतला आहे.  40 वर्ष वैद्यकीय व्यवसाय सांभाळत समाज सेवेची अनेक कामे केली. महिलांसाठी आधार केंद्र चालवलं,  अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्रीभ्रूण हत्या , विविध विषयांवर अमाफ काम केलं. समाजहितासाठी 40 वर्ष केवळ काम आणि काम त्या करत राहिल्या. परंतु, स्वतःच्या आयुष्याकड़े लक्ष द्यायला त्यांना वेळच  मिळाला नाही.  त्यांनी आजपर्यंत केलेल्या कामातून तणावच अधिक मिळाला. त्यामुळे त्यांनी हॅपी लाइफ जगण्यासाठी शेतीची निवड केली आहे.

समाजसेवक नरेंद्र दाभोलकर यांच्या पावलावर पाऊल ठेवून आयुष्यभर त्या समाज हितासाठी झटत राहिल्या.  दाभोलकर यांच्या हत्येनंतर त्यांनी आपला वैद्यकीय पेशा बंद केला आहे. निसर्गाचे देणे फेडण्यासाठी  आपण शेतीकडे वळलो. त्यातून आपल्याला सुखी जीवन मिळतंय, आपण निसर्गाशी एकरूप झालोय. वयाच्या  60  नंतर प्रत्येकाकडे वेळ असतो, आयुष्यभर पै - पै गोळा करून उतार वयात आपल्यावर औषध उपचारासाठी खर्च करण्यापेक्षा शेतीत काम करून सुखी जीवन जगावे, असं त्या आवर्जून सांगतात.

शैलाताई यांची दापोली शहराजवळील गव्हे येथे 17 एकर आंबा - काजू , नारळ , सुपारी , चीकू ची बाग आहे , या डोंगर उतारातील बागेत त्या नैसर्गिक शेती करत आहे. बागेतील झाडं न  झाडांची  ते दररोज देखभाल करतात. बागेतील पाला पाचोळ एकत्र करून सेंद्रिय खतांची निर्मिती करित आहेत.

ताण तणाव आण आजार टाळून आयुष्यातील शेवटचे क्षण सुखात घालवायचे असतील तर प्रत्येकांनी निसर्गाच्या सानिध्यात गेलं पाहिजे, शेती करून निसर्गाचं देणं फेडलं पाहिजे तरचं शैलाताई सारखं आपल जीवन सुद्धा सुखी होईल. त्यांना या शेतीतून त्यांना फार मोठे  पैसे मिळणार नाहीत.

परंतु, शेतीतून मिळणारा लाख मोलाचा आनंद लाखो रुपये मोजून सुद्धा मिलेळ की नाही शब्दात सांगता येणार नाही, असंही शैलाताई सांगायला विसरत नाहीत.

नरेंद्र दाभोलकर यांनी कन्या अॅड मुक्ता दाभोळकर ( पटवर्धन )  या दापोलीत राहतात.नरेंद्र दाभोलकर यांना दापोली हे ठिकाण खूप आवडायचे. डॉक्टर ब-याच वेळा अधून मधून दापोलीत येत असत. त्यामुळे  कदाचित शैलाताईंनी दापोलीची निवड केली असावी. या ठिकाणी राहून त्या अतिशय साधं पण सुखी जीवन जगत आहेत.

First published: December 22, 2019, 8:30 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading