Home /News /maharashtra /

'शाहरुख-सलमान'ची एंट्री अन् थिएटरमध्ये तरुणांनी फोडले सुतळी बॉम्ब, LIVE VIDEO

'शाहरुख-सलमान'ची एंट्री अन् थिएटरमध्ये तरुणांनी फोडले सुतळी बॉम्ब, LIVE VIDEO

. शहरातील सेंट्रल चित्रपटगृहात 'करण अर्जुन' चित्रपट लागला असून तो पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी होत आहे.

मालेगाव, 24 फेब्रुवारी : हिंदी आणि मराठी  चित्रपटसृष्टीतील हिरोच्या अदाकारीवर मालेगावाकर फिदा झालेले असतात. तरुण पिढीला अभिनेत्यांच्या मोहात इतकी पडली आहे की, त्यांच्या एंट्रीवर संपूर्ण सिनेमागृह डोक्यावर घेतात. 'करण अर्जुन' चित्रपटाच्या शोदरम्यान काही चाहत्यांनी शुक्रवारी सेंट्रल चित्रपटगृहात फटाके फोडून एका प्रकारे हुल्लडबाजी करत जल्लोष केला. आतषबाजीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याची गंभीर दखल घेऊन अज्ञात प्रेक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कोरोनामुळे गेल्या 10 महिन्यांपासून चित्रपटगृह बंद होते मात्र लॉकडाऊन अनलॉक झाल्यावर चित्रपटगृह सुरू करून पूर्ण क्षमतेने शो चालविण्याची परवानगी देण्यात आली. मालेगाव चित्रपट शौकिनांचे शहर म्हणून देखील ओळखले जात असल्याने येथील प्रेक्षक थिएटरमध्ये जाऊन चित्रपटाचा आनंद घेतात. कोरोना व लॉकडाऊनमुळे नवीन चित्रपट रिलीज होत नसल्याने मालेगावात जुने चित्रपट प्रदर्शित होत आहेत. शहरातील सेंट्रल चित्रपटगृहात 'करण अर्जुन' चित्रपट लागला असून तो पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी होत आहे. चित्रपट सुरू झाल्यावर शाहरुख व सलमान यांची एंट्री होताच त्यांच्या काही चाहत्यांनी अचानक फटाके फोडण्यास सुरुवात केली. सुतळी बॉम्बसह हवेत उडणारे फटाके फोडल्याने काही प्रेक्षकांची धावपळ उडाली. फटाके फोडले जात असताना काहींनी ही हुल्लडबाजी आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात कैद करून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले. व्हिडीओ व्हायरल होताच  अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी चौकशी आदेश दिले. पोलीस निरीक्षक संजय महाजन यांनी चौकशी करून अज्ञात प्रेक्षकांविरुद्ध भादंवी २८६ व महाराष्ट्र पोलीस कायदा ११२, ११७ नुसार गुन्हा नोंदवला. चार वर्षांपूर्वी २६ जून २०१७ रोजी देखील मोहन चित्रपटगृहात फटाके फोडण्याचा असाच प्रकार घडला होता. यातील नऊ संशयितांना अटक करण्यात आली होती. आपल्या आवडत्या हिरोची पडद्यावर एंट्री झाल्यानंतर फटाके फोडण्याची गेल्या दहा वर्षात  26  घटना घडल्या आहेत. नेते असो किंवा अभिनेते त्यांच्या नावाने काही चाहत्यांनी फॅन क्लब तयार केले आहेत. पूर्वी दिलीप कुमार, देवा आनंद, राज कपूर, धर्मेंद्र, मिथुन चक्रवर्ती यांचे फॅन अधिक होते. तेव्हा या अभिनेत्यांच्या एंट्रीच्या वेळी चिल्लर उधळली जात होती. सलमान, शाहरुख आमिर खान यांच्या चाहत्यांची संख्या वाढली. या तिघा अभिनेत्यांच्या चित्रपटादरम्यान फटाके फोडणे हा अनोखा फंडा तयार झाला आहे. मात्र, सध्या मालेगावात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून गर्दीमुळे त्याचा जास्त प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या