चालकाला लागली झोप आणि घडली दुर्घटना, भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

चालकाला लागली झोप आणि घडली दुर्घटना, भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूरजवळ भरधाव कारची गॅस टँकरला धडक.

  • Share this:

रवी शिंदे (प्रतिनिधी)शहापूर, 12 नोव्हेंबर: मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूरजवळ भीषण अपघात झाला आहे. परिवार हॉटेलजवळ कार आणि गॅस टँकरची जोरदार धडक झाली आणि भीषण दुर्घटना घडली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मुंबईहून नाशिकच्या दिशेने जात असताना हा प्रकार घडला. डोळ्यावर झोपे असतानाही कारचालक गाडी चालवत होता. त्यामुळे कार चालकाला त्याच्या कार आणि पुढे जात असलेल्या गँस टँकरमधील अंतराचा अंदाज आला नाही आणि वेगानं गाडी टँकरवर धडकली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. कारमधील दोघांचाही जागीच मृत्यू झाला. एका तरुणीचा समावेश आहे. महामार्ग पोलीस, पेट्रोलिंग, क्रेनच्या मदतीने गाडीत अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यात आलं. हे दोघे राजस्थानचे रहिवासी होते. घरातून पळून जात असताना हा प्रकार घडल्याचं शहापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीमधून समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: November 12, 2019, 12:42 PM IST
Tags:

ताज्या बातम्या