मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'उद्धव ठाकरे सांगोला दौऱ्यावर आल्यास आनंद होईल, मात्र त्यांचं स्वागत...'; शहाजीबापूंचा टोला

'उद्धव ठाकरे सांगोला दौऱ्यावर आल्यास आनंद होईल, मात्र त्यांचं स्वागत...'; शहाजीबापूंचा टोला

फाईल फोटो

फाईल फोटो

उध्दव ठाकरे सांगोला दौऱ्यावर आल्यास आनंद होईल. मात्र, त्यांचे स्वागत त्यांचे कार्यकर्ते करतील. मी शिंदे साहेबांचे स्वागत करेन, असं आमदार पाटील यांनी म्हटलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

सोलापूर 30 ऑक्टोबर : बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सांगोल्यातील आमदार शहाजी बापू पाटील यांनी आज सांगोला तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या गावांची पाहणी केली. नुकसान झालेल्या पिकांना केंद्र सरकारपेक्षा दुप्पट मदत केली जाईल, असे आश्वासन आमदार शहाजी बापू पाटील यांनी यावेळी दिले. यावेळी त्यांनी नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेशही दिले.

'..नाहीतर तोडफोड करून बाहेर पडणार', रणी राणांसोबतच्या वादावरुन बच्चू कडूंचा इशारा

मागील आठ दिवसांपूर्वी सांगोला तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. यामध्ये संगेवाडी, मांजरी परिसरातील मका, डाळिंब, सूर्यफुल या पिकांचे अधिक नुकसान झाले आहे. या नुकसानाची पाहाणी आज आमदार पाटील यांनी शासकीय अधिकाऱ्यांसमवेत केली. यावेळी त्यांनी नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे 10 गुंठे क्षेत्रसुद्धा मदतीपासून वंचित राहणार नाही, असं आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिलं.

यासोबतच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याबाबत प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, की पिकांना केंद्र सरकारच्या मदतीपेक्षा दुप्पट मदत करू. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. ते म्हणाले, की उध्दव ठाकरे सांगोला दौऱ्यावर आल्यास आनंद होईल. मात्र, त्यांचे स्वागत त्यांचे कार्यकर्ते करतील. मी शिंदे साहेबांचे स्वागत करेन, असं आमदार पाटील यांनी म्हटलं आहे.

अखेर 7 दिवसांनंतर कैलास पाटील यांचे उपोषण मागे, फडणवीस यांच्यासोबत चर्चेनंतर घेतला निर्णय

रवी राणा-बच्चू कडू वादावरही प्रतिक्रिया -

बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. यावरही शहाजीबापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शहाजीबापू म्हणाले, की 'बच्चू कडू यांची नाराजी ही रवी राणा यांच्यावर आणि त्यांच्या विधानावर आहे. त्यामुळे ही नाराजी शिंदे सरकारवर आहे, असं म्हणता येणार नाही. रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद लवकरच मिटेल', अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

First published:

Tags: Eknath Shinde, Ravi rana