यवतमाळ, 14 नोव्हेंबर : माझ्यावर गंभीर आरोप करणाऱ्या मनेका गांधींविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांकडे तक्रार करणार असल्याचं अवनी प्रकरणातील वादग्रस्त शिकारी शहाफत अली खान यानं म्हटलं आहे. त्याचप्रमाणे मनेका गांधींना कोर्टात खेचणार असल्याचा इशाराही त्यानं दिला आहे. धक्कादायक म्हणजे अवनीचे बछडे नरभक्षक झाले असून संधी मिळाल्यास त्यांनाही बेशुद्ध करण्याची तयारी असल्याचं विधान शहाफतनं केलं आहे.