कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, समितीनं दडपला चौकशी अहवाल

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, समितीनं दडपला चौकशी अहवाल

विद्यमान कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे हे या प्रकरणात लक्ष देत नसल्याने कुलपतींकडे याबाबत तक्रार करणार असल्याचेही डॉ.नानिवडेकर यांनी सांगितलं आहे.

  • Share this:

कोल्हापूर,7 मार्च: कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात 2012 ते 14 या काळात विद्यार्थिनींकडून लैंगिक छळाच्या तक्रारी आल्या होत्या. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात होती. मात्र, या समितीने चौकशी अहवाल दडपल्याचा आरोप स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालिका डॉ. मेधा नानिवडेकर यांनी केला आहे. विद्यमान कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे हे या प्रकरणात लक्ष देत नसल्याने कुलपतींकडे याबाबत तक्रार करणार असल्याचेही डॉ.नानिवडेकर यांनी सांगितलं आहे.

काय आहे प्रकरण?

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात 2012 ते 14 या काळात विद्यार्थिनींकडून लैंगिक छळाच्या तक्रारी आल्या होत्या. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विद्यापीठाने एक समिती नेमण्यात होती. समितीने प्रकरणाची चौकशीही केली. मात्र, जून 2016 पासून हा चौकशी अहवाल दडपून ठेवला आहे. या अहवालाची प्रत याचिकाकर्त्यांना उपलब्ध करून द्यावी आणि संबंधित प्रकरणांमधील दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी डॉ. मेधा नानिवडेकर यांनी केली आहे. विद्यमान कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे हे या प्रकरणात लक्ष देत नसल्याने कुलपतींकडे याबाबत तक्रार करणार असल्याचेही डॉ.नानिवडेकर यांनी सांगितलं आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठात आता स्त्री अभ्यास केंद्राकडून 'विद्यापीठ बचाव'चा नारा देण्यात आला आहे. मागणी करूनही कुलगुरू भेटत नसल्याचेही डॉ. नानिवडेकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे याबाबत विद्यापीठ प्रशासन अथवा कुलगुरू काय स्पष्टीकरण देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा..शिक्षकाचे विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे, युवा सैनिकांनी दिला बेदम चोप

दरम्यान, राज्यात महिला अत्याचाराच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. 2018 मध्ये महिलांवर अत्याचाराच्या 35,497 घटना घडल्या होत्या तर 2019 मध्ये याचं प्रमाण वाढलं आहे. गेल्या वर्षी महिला अत्याचारात वाढ होऊन 37,567 महिला अत्याचाराच्या घटनासमोर आल्या आहेत. 2019 मध्ये 5412 महिलांवर बलात्कारच्या घटनांची नोंद झाली आहे. महिला अपहरणाच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. त्यामुळे आता या नव्या घोषणांची अंमलबजावणी होणं अधिक महत्वाचं आहे.

आता प्रत्येक जिल्ह्यात महिला पोलीस स्टेशन

दुसरीकडे, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने मोठी घोषणा केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात महिलांच्या सुरक्षेवर अधिक भर देण्यात आला आहे. राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढत असतानाच अर्थसंकल्पात महिला सुरक्षेसाठी तसेच महिला सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न करण्याचं आश्वासन अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.

हेही वाचा..शिक्षिकेनेच काढले चिमुकलीला चिमटे, मुंबईतल्या Preschool मधला धक्कादायक प्रकार

महिलांसाठी प्रत्येक जिल्ह्यात पोलीस स्टेशन उभारले जाणार असल्याची घोषणा अजित पवारांनी यावेळी केली. विशेष म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये सर्व अधिकारी आणि कर्मचारी या महिलाच असतील, अशी महत्त्वाची घोषणा देखील अजित पवार यांनी केली. महिलांवर होणारा अन्याय, अत्याचार रोखण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. महिलांलवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हा महत्वाचा निर्णय घेण्यात आल्याचं अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केलं. त्यामुळे महिला अत्याचाराच्या घटना कमी होणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे. प्रत्येक जिल्ह्यात महिला आयोगाचं कार्यालय स्थापन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

ठाकरे सरकार महिला सक्षमीकरणासाठी विशेष योजना राबणार असल्याचं अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. यंदा महिला धोरणाला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री रोजगार कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. महिला बचत गटांना उभारी देण्यासाठी त्यांच्याकडून एक हजार कोटी रुपयांची उत्पादन खरेदी करणार असल्याचं यावेळी अजित पवारांनी म्हटलं आहे.

हेही वाचा..मोबाईलला हात लावला म्हणून नवऱ्याने पाडले पत्नीचे 4 दात, रॉकेल टाकून...

First published: March 7, 2020, 3:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading