कॉलेजच्या स्वच्छतागृहात सुरक्षा रक्षकाने केला शिक्षिकेचा विनयभंग

कॉलेजच्या स्वच्छतागृहात सुरक्षा रक्षकाने केला शिक्षिकेचा विनयभंग

कॉलेजमध्ये ही बातमी कळताच संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी अनिलला पकडून चांगलाच चोप दिला आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं.

  • Share this:

प्रशांत बाग, नाशिक 30 ऑगस्ट : ज्यांच्यावर सुरक्षेची जबाबदारी असते त्यांनीच गुन्हा केला तर तो जास्तच गंभीर गुन्हा असतो. नाशिकच्या वसंतराव नाईक कॉलेजमध्ये आज असाच संतापजनक प्रकार घडलाय. कॉलेजच्या महिलांच्या स्वच्छतागृहात सुरक्षारक्षकानेच शिक्षिकेचा विनयभंग केल्याची घटना घडली. या घटनेने मोठी खळबळ उडाली. हा सुरक्षा रक्षक तेवढ्यावरच थांबला नाही तर त्याने फोटोही काढल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. या घटनेमुळे कॉलेजमधल्या केवळ विद्यार्थीनीच्याच नाही तर सर्वच महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

नाशिकच्या वसंतराव नाईक कॉलेजमध्ये आज सकाळी ही घटना घडली. अनिल पवार असं आरोपी सुरक्षा रक्षकाचं नाव आहे. आज सकाळी तो ड्युटीवर होता. त्यावेळी तो महिलांच्या प्रसाधनगृहात गेला आणि शिक्षिकेचा विनयभंग केला. घाबरलेल्या शिक्षिकेने याची तक्रार मुख्याध्यापकांकडे केली आणि शाळा प्रशासनाने पोलिसांमध्ये तक्रार दाखल करत अनिल पवारला पोलिसांच्या ताब्यात दिलं.

कॉलेजमध्ये ही बातमी कळताच संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी अनिलला पकडून चांगलाच चोप दिला. सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा-राजकारणातून अलिप्त व्हावसं वाटतंय, उदयनराजेंचं खळबळजनक वक्तव्य

आईने घेतला मुलांसमोर गळफास

दोन चिमुकल्यांसह आईचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना वर्ध्यात घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर दोन चिमुकल्यांचाही मृत्यू झाल्यामुळे घटनेवर हळहळ व्यक्त केली जात आहे. उत्तम वर्धा स्टील कॉलनीमध्ये हा प्रकार घडला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला आहे. आईने नेमकी कोणत्या कारणावरून आत्महत्या केली याचा पोलीस शोध घेत आहेत.

गंभीर म्हणजे आत्महत्या करण्यासाठी आईने घराचे दरवाजे आणि खिडक्या बंद केल्या आणि गळफास लावून घेतला. पण यामध्ये लहान मुलांचा घरात गुदमरून मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती स्थानिक पोलिसांकडून देण्यात आली आहे. सविता आशिष साहू (31), आयुष आशिष साहू (3), ओरा आशिष साहू (9) अशी मृतांची नाव असल्याचं सांगण्यात येत आहे.

वाचा-...आणि पद्मसिंह पाटलांवरच्या प्रश्नावर शरद पवार भडकले!

घरात काहीतरी घडलं असल्याची शेजाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी या प्रकरणी सावंगी पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती मिळवली. त्यात मुलांचा श्वास कोंडल्याने तर महिलेचा गळफास घेऊन मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 30, 2019 03:38 PM IST

ताज्या बातम्या