संतापजनक! नात्याला कलंक, 3 आणि 5 वर्षांच्या सख्या बहिणींवर 50 वर्षीय काकानेच केले अत्याचार

संतापजनक! नात्याला कलंक, 3 आणि 5 वर्षांच्या सख्या बहिणींवर 50 वर्षीय काकानेच केले अत्याचार

चिमुकल्यांवर अत्याचार करणारा 50 वर्षीय आरोपी हा पीडित मुलींचा काका असल्याचं समोर आलं आहे.

  • Share this:

पुणे, 20 मार्च : पुण्यातील कोथरुड भागात तीन आणि साडेचार वर्षांच्या दोन सख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. चिमुकल्यांवर अत्याचार करणारा 50 वर्षीय आरोपी हा पीडित मुलींचा काका असल्याचं समोर आलं आहे.

कोथरूडमध्ये दोन चिमुकल्यांवर त्यांच्या काकाने लैंगिक अत्याचार केले. ही बाब पीडित मुलींच्या पालकांच्या लक्षात आल्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर आता पोलीस पीडित मुलींच्या घरी दाखल झाले आहेत.

काका-पुतणीच्या नात्याला कलंक लावत 50 वर्षीय नराधमाने लहान मुलींवर केलेल्या अत्याचाराच्या या घटनेनंतर शहरात मोठा संताप पसरल्याचं पाहायला मिळत आहे. या प्रकरणातील आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी आता संतप्त नागरिक करत आहेत.

दरम्यान, गेल्या काही काळापासून समोर आलेल्या लैंगिक अत्याचाराच्या अनेक प्रकरणांत नातेवाईक किंवा ओळखीचीच व्यक्ती असं कृत करत असल्याचं निदर्शनास येत आहे. त्यामुळे नातेसंबंधांची दोर उसवली जातेय का, असा प्रश्न निर्माण होतोय.

VIDEO : अमोल कोल्हेंची उद्धव ठाकरे आणि शिवसेनेबद्दल प्रतिक्रिया

First published: March 20, 2019, 9:20 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading