Home /News /maharashtra /

गतीमंद महिलेवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, संशयिताने पोलीस स्टेशनमध्येच केला जीव देण्याचा प्रयत्न

गतीमंद महिलेवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, संशयिताने पोलीस स्टेशनमध्येच केला जीव देण्याचा प्रयत्न

पहाटे दोन वाजेच्या सुमारास टॉवेलच्या मदतीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

पंढरपूर, 16 जानेवारी : गतीमंद महिलेवर लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या संशयित आरोपीने पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पंढरपुरात संशयित आरोपीचा पोलिस स्टेशन मधील लाॅक अप मध्येच आत्महत्येचा प्रयत्न, संशयित आरोपी वर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू प्रकृती अत्यवस्थ पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन मधील लॉक अपमध्ये संशयित आरोपी अर्जुन शितोळे (वय ५०) याने आज पहाटे दोन वाजेच्या सुमारास टॉवेलच्या मदतीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सदर संशयित आरोपीने तुंगतमध्ये एका गतिमंद महिलेवर अत्याचार केला होता. या प्रकरणात संशयित आरोपी शितोळेवर पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये भादंवि कलम ३७६ आणि अट्रॉसिटी कायद्याने गुन्हा दाखल झाला होता. अर्जुन शितोळे न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. आज पहाटे दोन वाजता लॉक अपमध्येच त्याने टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार तिथे उपस्थितीत आलेल्या पोलिसांच्या लक्षात आला आणि त्यांनी धाव घेऊन फासातून त्याची सुटका केली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ शितोळे याला खाजगी रूग्णालयात सुरू उपचारासाठी दाखल केले. सध्या शितोळे यांची प्रकृती चिंताजनक आहे. कौटुंबिक वादातून महिलेची हत्या,आरोपी पतीला अटक दरम्यान, नागपूर शहरातील वाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आंबेडकर नगर येथे एका इसमाने घरगुती भांडणातून स्वतःच्याच पत्नीची हत्या केल्याची घटना उजेडात आली आहे. मृतक महिलेचे नाव अल्का सोनपिपळे असं असून तिचा खून करणाऱ्या आरोपीचे नाव सिद्धार्थ सोनपिपळे असं आहे. आरोपीने स्वतःच्या बायकोची हत्या केल्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केल्यानंतर खून झाल्याची घटना समोर आली आहे. मृतक अलका ही आरोपी सिद्धार्थ सोनपिपळे याची दुसरी पत्नी होती. पहिल्या बायकोशी पटत नसल्याने त्याने अल्कासोबत दुसरा संसार थाटला होता. गेल्या काही दिवसांपासून अल्का आणि सिद्धार्थ यांच्यात कौटुंबिक कारणांवरून वाद-विवाद सुरू होते. घटनेच्या आधी सुद्धा त्यांच्यात भांडण झाल्याने अल्काने रागाच्या भरात घर सोडले होते. सकाळी राग शांत झाल्यानंतर ती सकाळी घरी परतल्यानंतर पुन्हा सिद्धार्थने पुन्हा तिच्याशी भांडण केलं. यावेळी आरोपीने घरात ठेवलेल्या बत्याने तिच्या डोक्यावर वार केले. ज्यामुळे अल्काचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर आरोपी दिवसभर वाडी परिसर फिरत राहिला. मात्र, संध्याकाळ होताच त्याने वाडी पोलीस स्टेशन गाठून बायकोच्या हत्येची कबुली पोलिसांच्या समक्ष दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून अल्काचा मृतदेह उत्तरीय तपासणी करिता पाठवून आरोपी सिद्धार्थ ला अटक केली आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या