11 वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार, असं आलं आईच्या लक्षात

11 वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार, असं आलं आईच्या लक्षात

एकीकडे महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर असतानाच आता बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न समोर आला आहे.

  • Share this:

सोलापूर,7 मार्च:एकीकडे महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर असतानाच आता बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न समोर आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील कारण बार्शीतील मोल मजुरी करून उपजिविका करणाऱ्या कुटुंबातील अकरा वर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे अनैसर्गिक अत्याचार केल्यानंतर त्या बालकाला धमकीदेखील देण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी बार्शी शहर पोलिसांत बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा म्हणजेच पोक्सो आणि भादंवि 1860 च्या कलम 377 आणि 506 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा...मोबाईलला हात लावला म्हणून नवऱ्याने पाडले पत्नीचे 4 दात, रॉकेल टाकून...

असं आलं आईच्या लक्षात..

ही घटना उघडकीस येण्याचे कारण म्हणजे, मुलाला जेवायला नीट बसता येत नसल्याचे आईच्या लक्षात आले. त्यावेळी आई आणि वडिलांनी त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता पीडित मुलाने घडलेला प्रकार सांगितला. शेजारीच राहणाऱ्या 21 वर्षीय तरुणाने दूध पिशवी घेऊन ये. मी तुला पैसे देतो असं सांगून पीडित मुलाला बोलावलं. पीडित मुलाला विवस्त्र करुन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. याबाबत कोणाला काही सांगितलं तर बघ, अशी धमकीही दिली.

हेही वाचा...शिक्षकाचे विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे, युवा सैनिकांनी दिला बेदम चोप

पीडित मुलाने सांगितलेली आपबिती ऐकून पीडित मुलाच्या वडिलांनी अत्याचार करणाऱ्या तरुणाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन बार्शी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास पीएसआय शिवाजी जायपत्रे हे करीत आहेत. आरोपीला कोर्टात हजर केले असता त्याला 11 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

First published: March 7, 2020, 4:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading