भूत उतरवण्याच्या नावाखाली भोंदू बाबाकडून महिला भक्तांचं लैंगिक शोषण

भूत उतरवण्याच्या नावाखाली भोंदू बाबाकडून महिला भक्तांचं लैंगिक शोषण

भोंदू बाबाकडून भक्तांचं लैंगिक शोषण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भक्तांच्या तक्रारीवरून बाबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Share this:

प्रदीप भाणगे (प्रतिनिधी),

कल्याण, 11 मे- भोंदू बाबाकडून भक्तांचं लैंगिक शोषण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भक्तांच्या तक्रारीवरून बाबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूत उतरवण्याच्या नावाखाली भोंदू बाबाने भक्तांचं लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याण जवळच्या टिटवाळ्यात उघड झालाय. याप्रकरणी बाबाविरोधात गुन्हा दाखल झाला असून बाबा पसार झाला आहे.

भूत उतरवण्याच्या नावाखाली केलं अनेकांचं शोषण..

ललजीत सिंग उर्फ मंजू माताजी असं या भोंदू बाबाचं नाव असून तो स्वतःला वैष्णोदेवीचा मोठा भक्त असल्याचं सांगायचा. त्याने टिटवाळ्याच्या मांडा भागात मोठं मंदिर उभारलं असून तिथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना हातचलाखीने हवेतून काजू, बदाम, चांदीचे शिक्के काढून तो प्रसाद म्हणून देत होता. त्याच्या या भोंदूगिरीला भुलून उल्हासनगरच्या एका भक्ताने त्याच्या आश्रमात सेवा सुरू केली. या भक्ताच्या पत्नीची तब्येत ठीक नसल्याचं समजल्यानंतर तिच्यावर कुणीतरी करणी केली असल्याची बतावणी बाबाने केली. तसंच ही करणी उतरवण्यासाठी बाबाने भक्ताला त्याच्याशी अनेकदा अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं. मात्र, त्यानंतरही भक्ताच्या पत्नीच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्यानं भक्ताने बाबांवर लक्ष ठेवायला सुरुवात केली आणि त्यातूनच बाबा अनेकांचं लैंगिक शोषण करत असल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे पीडित भक्ताने अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार टिटवाळा पोलीस ठाण्यात मंजू माता या भोंदू बाबाविरोधात जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र यानंतर हा बाबा लसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेतायत.

SPECIAL REPORT: लग्नाआधीच सलमान खान होणार 'बाबा'?

First published: May 11, 2019, 7:28 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading