सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, शॉपिंग मॉलमधून 17 मुलींसह 24 जणांना अटक

कारवाईदरम्यान पोलिसांनी शरीरविक्री करणाऱ्या मुलींसह ग्राहकांनाही अटक केली.

News18 Lokmat | Updated On: Aug 14, 2019 11:57 AM IST

सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, शॉपिंग मॉलमधून 17 मुलींसह 24 जणांना अटक

गुरुग्राम, 14 ऑगस्ट : गुरुग्राम शहरात शॉपिंग मॉलमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यावेळी 24 जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये 2 मुली, 15 महिला, स्पा सेंटरचा मॅनेजर आणि 7 ग्राहकांचा समावेश आहे.

हरियाणातील गुरुग्राममध्ये एका शॉपिंग मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करण्यात येत होता. याबाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या शॉपिंग मॉलमध्ये धाड टाकत कारवाई केली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी शरीरविक्री करणाऱ्या मुलींसह ग्राहकांनाही अटक केली.

दरम्यान, स्पा सेंटरवर छापा टाकण्याआधी पोलिसांनी एक युक्ती वापरली. पोलिसांच्या टीममधील एकजण या स्पा सेंटरमध्ये ग्राहक म्हणून दाखल झाला. या पोलिसाची तिथं बोलणी झाल्यानंतर त्याने आपल्या टीमला याबाबत सूचना केली. त्यानंतर पोलिसांच्या टीमने तिथं छापा टाकला. यावेळी काही तरुणी या त्यांच्या ग्राहकांसोबत आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आल्या तर काहीजणी या ग्राहकांची वाट पाहत होत्या.

वेश्याव्यवसाय सुरू असल्याचं खात्री झाल्यानंतर पोलिसांनी या स्पा सेंटरवर कारवाई केली. तसंच स्पा सेंटरच्या मालकासह ग्राहक आणि शरीरविक्री करणाऱ्या तरुणींना बेड्या ठोकल्या. 'अमर उजाला'ने दिलेल्या वृत्तानुसार शरीरविक्री करणाऱ्या तरुणी या राजस्थान, तमिळनाडू, दिल्ली, मणिपूर, पश्चिम बंगाल, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यातील आहेत. या प्रकरणात पोलीस आता अधिक तपास करत आहेत.

VIDEO : भाजप नगरसेविकेनं पूरग्रस्तांवरच उचलला हात, लोकांनी दिल्या 'भाजप मुर्दाबाद'च्या घोषणा

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 14, 2019 11:57 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...