नागपुरात पुन्हा हायप्रोफाईल सेक्सरॅकेट, स्पा-सलुनच्या नावाखाली सुरु होता कुंटनखाणा

नागपुरात पुन्हा हायप्रोफाईल सेक्सरॅकेट, स्पा-सलुनच्या नावाखाली सुरु होता कुंटनखाणा

उपराजधानीचं शहर नागपूरात उच्चभ्रू परिसरात पुन्हा एकदा हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

  • Share this:

नागपूर,7 मार्च: उपराजधानीचं शहर नागपूरात उच्चभ्रू परिसरात पुन्हा एकदा हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने शुक्रवारी ही कारवाई केली आहे. प्रसिद्ध मॉलमधील एका स्पा-सलुनमध्ये सर्रासपणे देहविक्री केली जात होती. पोलिसांनी सापळा रचून हायप्रोफाईल सेक्सरॅकेटचा पर्दाफाश करून दलाल महिलेला अटक करून पीडित तरुणीची सुटका करण्यात आली आहे.

हेही वाचा...भाजप पदाधिकाऱ्यांने भररस्त्यावर शिवसेनेच्या नगसेवकाला केली शिवीगाळ

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शहरातील मनीषनगर परिसरातील जयंती नगरीतील ते सेरासेरा या प्रसिद्ध शॉपिं मॉलमध्ये गॉर्जियस ब्युटी सलून आहे. महिला दलाल गेल्या अनेक दिवसांपासून स्पा आणि सलुनच्या नावाखाली देहविक्रीचा गोरखधंदा चालवत होती, अशी माहिती पोलिसांच्या सामाजिक शाखेला मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून सलुनमध्ये पंटरला ग्राहक म्हणून पाठवले होते. महिला दलालने सलुनमध्ये मुलगी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली. पंटरने सौदाही निश्चित केला. सलुनमध्ये मुलगी येताच पंटरने इशारा करताच पोलिसांनी सलुनवर छापा टाकून महिला दलालला अटक केली. तसेच पीडित तरुणीची सुटका केली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नागपुरात सेक्स रॅकेटचं लोन झपाट्यानं पसरलं आहे. शहरातील अनेक पॉश बिल्डिंग आणि उच्चभ्रू वस्त्यामधील कुंटनखाण्यांचा यापूर्वीही भंडाफोड झाला आहे.

हेही वाचा...11 वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार, असं आलं आईच्या लक्षात

नागपूरमध्येही झाला सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

नागपूरमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा दोन दिवसांपूर्वी पर्दाफाश झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या सेक्स रॅकेटमध्ये सुशिक्षित तरुणींचा सहभाग असल्याचं उघड झालं आहे. स्वतःचे महागडे हौस पूर्ण करण्या साठी हायप्रोफाईल सेक्स रॅकेटमध्ये काम करणाऱ्या दोन तरुणींना गुन्हे शाखेने सोडवलं. इंदूर आणि कोलकातामधून या तरुणींना नागपुरात शरीरविक्रीच्या व्यवसायासाठी आणण्यात आलं होतं, अशीही माहिती समोर आली आहे. नागपुरातील सीए रोड परिसरातील हॉटेल ओयो टाऊनमध्ये छापेमारी करत या काळ्या बाजाराची पोल खोल गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने केली आहे.

First Published: Mar 7, 2020 06:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading