Home /News /maharashtra /

पुण्यात हे काय सुरू आहे? सलग दुसऱ्या दिवशी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुण्यात हे काय सुरू आहे? सलग दुसऱ्या दिवशी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं शहरात सलग दुसऱ्या दिवशी शहरात छापेमारी करून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

    पुणे,1 ऑक्टोबर: पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं शहरात सलग दुसऱ्या दिवशी शहरात छापेमारी करून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पुणे-बंगळुरु महामार्गावरील एका लॉजमध्ये छापा टाकून पोलिसांनी तीन जणांना अटक करून दोन तरुणींची सुटका केली आहे. या प्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमधील एका हॉटेलावर काल (बुधवारी) छापा टाकला होता. या कारवाईत चार जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. हेही वाचा..यूपीमध्ये गुंडाराज! राहुल गांधींना धक्काबुक्कीवरून बाळासाहेब थोरात संतापले वारजे माळवाडी परिसरात पुणे-बंगळूरु महामार्गावरील एका लॉजवर देहविक्री व्यवसाय सुरू असल्याची गोपनिय माहिती पोलिसांनी मिळाली होती. माहितीची खात्री करून पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकानं 'साई एक्झिक्युटिव्ह' नामक लॉजवर छापा टाकला. या वेळी लॉजमध्ये दोन तरुणी, एक महिला आणि दोन पुरुष आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी या प्रकरणी एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली. जितेंद्र उर्फ जितू बाबासाहेब नंदिरे (वय-32, रा. काळेवाडी), रामकिसन व्यंकट जाधव (वय-35, जनता वसाहत) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैशाली चांदगुडे, अण्णा माने, अश्विनी केकान, हनुमंत कांबळे, संदीप कोळगे यांच्या पथकानं ही कारवाई केली. हिंजवडी आयटी पार्कमध्ये सेक्स रॅकेट... हिंजवडी आयटी पार्कमधील हॉटेलावर छापा टाकून पिंपरी पोलिसांनी बुधवारी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट 4 नं ही कारवाई केली. या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतलं आहे तर हॉटेलमध्ये असलेल्या चार तरुणींची सुटका करण्यात आली. गणेश कैलास पवार (वय-20) समीर ऊर्फ राज ऊर्फ तय्यब सय्यद, युसूफ शेख, हिरा अशी आरोपींची नावं असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन शिंदे यांना सेक्स रॅकेटबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार येळवंडे वस्तीमधील हॉटेल ग्रॅन्ड मन्नत या हॉटेलवर छापा टाकण्यात आला. हेही वाचा...पार्थ पवार यांची 'सत्यमेव जयते'कडे वाटचाल सुरू, चंद्रकांतदादांनी वाढवला सस्पेन्स असा सुरू होता गोरखधंदा.. पोलिस चौकशीत समोर आलेली माहिती अशी की, आरोपींनी इंटरनेटवर एस्कॉर्ट सर्व्हिसेसच्या नावाखाली स्वतः चे व्हॉट्सअॅप क्रमांक प्रसारित केले होते. त्या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर ते तरुणींचे फोटो संबंधित ग्राहकांना पाठवत. त्यानंतर सौदा झाल्यावर ग्राहकास हॉटेलचा पत्ता देत होते. सेक्स रॅकेटचं जाळ किती मोठं आहे, या प्रकरणी हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Pune, Pune crime news, Pune police, Sex racket

    पुढील बातम्या